Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद




 

परभणी ➡️ येथील ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 13 मार्च रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन परभणी महानगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 350 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. (vnsnews-24, education, parbhani ) 






या कार्यक्रमास आरोग्य विभागाच्या डॉ. आरती देऊळकर यांनी विद्यार्थ्यांना जागरूक पालक व सुदृढ बालक या अभियानाबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व सांगितले. या शिबिराअंतर्गत विद्यार्थ्यांचे वजन, उंची व आरोग्याची तपासणी करण्यात आली तसेच जे विद्यार्थी दातांची काळजी घेत नाहीत किंवा रेगुलर ब्रश करीत नाहीत अशा विद्यार्थ्यांना ब्रश करण्यासाठी डॉक्टरांनी सल्ला दिला. 




याबरोबर विद्यार्थ्यांनी रोज जास्त पाणी प्यावे व पौष्टिक आहाराचे सेवन करावे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेस्क्रीप्शन च्या माध्यमातून दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका प्रिया ठाकूर , बनश्री सूर्यवंशी व अशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश कापसे, अंजली अवचार, अजहर मिर्झा व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.








Post a Comment

0 Comments