Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना वनहरी सेवाभावी प्रतिष्ठान व प्रतिष्ठीत नागरिकांची श्रद्धांजली




सेलू ➡️ सेलू अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना वनहरी सेवाभावी प्रतिष्ठान व सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



या श्रध्दांजली कार्यक्रमात भावना व्यक्त करतांना डॉ .ऋतुराज साडेगावकर म्हणाले सामाजिक बांधिलकीच्या कार्यातुन आपली उंची वाढू शकते.  हे सिंधुताई मायीनी दाखवून दिले. आपण केलेले कार्य तर निस्प्र:ह असेल तर समाज नोंद घेतो. 


प्रत्येकांनी आपले काम करतांना आपण समाजहित लक्षात घेऊन काम केले पाहिजे . मायेने जवळ केलेले अनाथ बालकं आज आणि त्याच बरोबर सामाजिक चळवळीत काम करणारे असंख्य कार्यकर्ते सिंधुताई यांच्या जाण्याने  पोरकी झाली. आपण सर्व आज या ठिकाणी शोकाकुल वातावरणात भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करीत आहोत .

 


सेलू शहरातील सामाजिक प्रतिष्ठित व्यक्ती डॉ. राजेंद्र गात , डॉ शिवाजी निलवर्ण, शेतकरी संघटनेचे नेते किशोर जोशी ,लालू खान ,विजय नाईक नवरे, उदय लोणीकर, अल्ताफ मास्टर, शेख मुनीर ,भगवान राठोड ,नंदकुमार पारिख, प्रकाश खारकर , भीमराव आंधळे, दिलीप डासाळकर रामप्रसाद गोरे, महादेव आगजाळ इत्यादी या कार्यक्रमात उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments