Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलूत बाजार समिती लिलावात पांढर सोन झाले दहा हजारी




 सेलू   ➡️  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापुस लिलावात आज कापसाला प्रति क्विंटल 10 हजार रूपये भाव मिळाल्याने पांढर सोन झाले 10 हजारी असे म्हणत शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.


सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  पाथरी रोडवरील कापुस यार्डात झालेल्या शेतकऱ्यांचा कापूस लिलावात जास्तीत जास्त 10 हजार व सरासरी 09 हजार 700 रुपये प्रति क्विंटल खरेदी करण्यात आला. या लिलावात तिनशे वाहनांची कापूस खरेदी करण्यात आली. यामध्ये  एकुण 01 लाख 25 हजार क्विंटल कापूस खरेदी केला गेला.



कापसाचे सूरवाती पासुनच भाव चढ उतार होत होते. त्यामुळे ब-याच शेतकऱ्यांनी यंदा कापूस 10 हजार पार होणार याची कल्पना होती. गरजे पुरता कापूस काढून मागच्या हाताने ठेवलेला कापूस आता शेतकरी काढत आहेत. त्यामुळे आता कापसाची आवक वाढल्याची दिसते व कापसाला मिळालेला भाव पहाता शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. स्‍वच्‍छ व पाणी विरहीत कापूस शेतकऱ्यांनी आणण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणजित गजमल व सचिव वाघ यांनी केले.



शेतकऱ्यांनी आपल्या कापसाला उच्चप्रतिचा भाव मिळावा; यासाठी स्वच्छ, कचरा व पाणी विरहीत कापूस विक्रीस आणण्याचे तसेच कापूस विक्रीसाठी सकाळी 09 वाजता मार्केट कमिटी यार्ड परिसरात आणून सोबत शेतकऱ्यांनी बँकेच्या पासबूकची झेराँक्स, आधार कार्ड झेराँक्स सोबत आणण्याचे आवाहन बाजार समिती मार्फत करण्यात आले.






Post a Comment

0 Comments