Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴ सुनील होता म्हणून परभणीत नाशिक घटनेची पुनरावृत्ती टळली, जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टचा पाईप फुटला






कोरोना रुग्णांसाठी सुनील कुलकर्णी ठरले हिरो 


परभणी ➡️ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टच्या पाईपवर वादळी वाऱ्यामुळे झाडाची फांदी पडल्यामुळे ती फुटल्याची घटना 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच मदतीला धावून आलेले बायोमेडिकल इंजिनीअरिंग सुनील कुलकर्णी सर्वांना देवदूत ठरले. अश्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनला काय करावे हे सुचत नव्हते, तिथे सुनील कुलकर्णीने केवळ 15 मिनटात 90% टक्के ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करुन दिला. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या 40 कोरोना रुग्णांचा जीव वाचला. अन्यथा नाशिक घटनेची पुनरावृत्ती होती की काय अशी शंका निर्माण झाली होती. विशेष म्हणजे याठिकाणी जोडण्यात आलेली ऑक्सिजनची पाईप लाईन ही कोणते ही आधारा शिवाय हवेत तरंगत होती. ही पाईप लाईन बसविणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार हे पाहावे लागेल. 


त्या रात्री काय झाले....?


परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांसह इतर अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच एक ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात आलेला आहे. मंगळवारी (ता. 27) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जोराचे वादळी वारे सुटले होते. या वाऱ्यामुळे ऑक्सिजन प्लॅन्टजवळ असलेले एक मोठे झाड या ऑक्सिजन प्लॅन्टच्या पाईपवर तुटून आदळले. ज्या पाईपवर हे झाड आदळले तोच पाईप हा रुग्णांना ऑक्सिजन पुरविणारा होता. तो पाईप फुटल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती होत होती. याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने जिल्हा शल्यचिकित्सकांसह आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना फोनद्वारे कळविली.


त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधिक्षक जयंत मीना, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नानलपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेवून घटनास्थळ गाठले. 


ही ऑक्सिजन पाईप लाईन कोण व कशी जोडली ..?


ही पाईप लाईन तुटली माहिती एका फार्मासिस्टीने आपल्या मित्र बायोमेडिकल इंजिनीअरिंग असलेले सुनील कुलकर्णी यांना दिली. ते सध्या एच केअर मेडिकल इंजिनिअरिंगचे संचालक म्हणून काम करतात. त्यांना 11 वर्ष फील्ड वर्कचा अनुभव आहे. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचले. जिल्हा रुग्णालयातील पाईप लाईन ही आईसीओ ते क्याजुअलटी पर्यंत जोडली गेली आहे. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रथम बाॅल वॉलचे काम 15 मिनिटात पुर्ण केले. त्यामुळे 90% ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर ऑक्सिजन प्लॅन्टला जोडलेली मेन पाईप लाईन दुरूस्त केली. सर्व लाईन जोडण्यात 03 तासांपेक्षा कमी वेळ लागला. या रुग्णालयातील 300 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण होते. त्यातील 40 -50 रुग्ण हे ऑक्सिजनवर होते, अशी माहिती मिळाली आहे.


यात दोषी कोण ...?  दुसरी पर्याय व्यवस्था रुग्णालयात आहे का..?  


नाशिकच्या दुर्घटनेपासून कोणताही बोध परभणीचा आरोग्य यंत्रणेने घेतला नाही ही बाब यानिमित्ताने स्पष्ट झाली. केवळ निलगिरीच्या झाडाची फांदी खाली पडल्यानंतर जर ऑक्सिजनच्या पाईपलाईनची गळती होत असेल तर ही बाब संबंधित यंत्रणेच्या गलथानपणाचा कळस मानली पाहिजे. विशेष म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवामान विभागाच्यावतीने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त होत असताना या ऑक्सिजनच्या पाईपलाईनला कोणतीही सुरक्षितता पुरवली गेली नाही. सर्वात मोठी चुक ही ऑक्सिजन पाईप लाईनचे काम हे औरंगाबादच्या नाॅन टेक्निकल ठेकेदारकडून करून घेण्यात आले. त्यांनी ही पाईप लाईनला कोणतेही ठोस आधार नाही देता हवेत उघडी राहु दिली. हेच मुुुुख्य कारण होते ही ऑक्सिजन पाईप लाईनच फुटण्याची.


ह्या पाईप लाईनला आग लागली असती तर पुर्ण फायबर पाईप लाईन जाळून गेली असती. काय झाले असते? दुसऱ्या कारणाने समजा हा ऑक्सिजन प्लँट मधुन ऑक्सिजन पुरवठा बंद झाला तर रुग्णालयात अन्य पर्याय व्यवस्था करण्यात आली आहे का ?  नाही, हे या घटनामुळे उघड झाली आहे. याच रुग्णालयात जिल्हा प्रशासनाने अश्या आणीबाणीच्या काळात दुसरी तातडीची पर्याय व्यवस्था करने आवश्यक आहे. 


पोलिस विभागाकडून 40 ऑक्सिजन सिंलेडरची व्यवस्था केली




जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दोन्हीही जलद प्रतिसाद पथकांना घटनेचे गांभीर्य लक्षात आणुन दिले. एका पथकास दवाखान्यात उपलब्ध असलेले ऑक्सिजनचे भरलेले सिलेंडर कोरोना वार्डात आणण्यास सांगीतले. ही सर्व कामे अत्यंत जलद गतीने झाली. जलद गती पथकाने अस्थिविभागाच्या शेजारी असलेले 10 ते 12 ऑक्सिजनने भरलेले सिलेंडर कोरोना वार्डात टाकले. ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर एका ट्रॅक्‍टरमध्ये टाकून भरलेले सिलेंडर आणण्यासाठी एमआयडीसी येथे ऑक्सिजन प्लँटकडे रवाना झाले.


त्यांना तात्काळ भरलेले सिलेंडर आणण्याबाबत मा.पोलीस अधीक्षक यांनी सुचना दिल्या. थोड्याच वेळेत 40 ऑक्सीजनने भरलेले सिलेंडर घेवून पथक दवाखाण्यात आले. या जलदगती प्रतिसाद पथकात अंमलदार गणेश पावडे, पोलीस शिपाई नवनाथ लोंढे, अभिषेक नवघरे, सादेकखा पठाण, मोहितखा पठान, शैलेश टाकरस, शेख इब्राहिम शेख युनूस, गणेश यादव, चालक साईनाथ मोरे, विजय शेजवळ आदीचा समावेश होता.







Post a Comment

0 Comments