Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

03 दिवसीय ऑनलाइन प्राणायाम व ध्यानशिबिराचे आयोजन





सेलू ➡️  नूतन महाविद्यालय क्रीडा विभाग,हेल्थ क्लब आणि आर्ट ऑफ लिविंग सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दि. 09 जून 2021 ते 11 जून 2021 या कालावधीत 'मोफत ऑनलाइन प्राणायाम व ध्यानशिबिर' याचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात शाररिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी तसेच फुफुसाची कार्यक्षमता, ऑक्सिजन पातळी नियंत्रित ठेवणे आदींवर पुरुषोत्तम वायाळ, भास्कर मगर,किशोर घडे यांच्याकडून मार्गदर्शन लाभणार आहे. सकाळी 07 ते 07.30 आणि सायंकाळी 07 ते 07.30 अश्या 02 सत्रात 03 दिवसीय ऑनलाइन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचा लाभ घेण्याचे असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ एस एम लोया, सचिव डी के देशपांडे, सहसचिव डॉ व्ही के कोठेकर आणि जयप्रकाश बिहानी, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा नागेश कान्हेकर, प्रा के. के. कदम, मुख्याध्यापक रामकीशन मखमले, मुख्याध्यापिका संगीता खराबे, मुख्याध्यापिका आर आर देशपांडे, पर्यवेक्षक डी डी सोंनेकर, गणेश माळवे, किशोर ढोके, प्रा महेश कुलकर्णी यांनी केले.




Post a Comment

0 Comments