Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

💎 परभणीत कारच्या धडकेत दोन शिक्षकांचा मृत्यू




परभणी ➡️भरधाव वेगाने जाणार्‍या एका कारने मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोटारसायकलवर बसलेले दोन शिक्षकांंचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी दि.14 जूलै रोजी सायंकाळी ही घटना घडली.







प्राप्त माहितीनुसार आज सायंकाळी पाचच्या सुमारास कारेगाव रस्त्यावरील लोकमान्य नगरात वास्तव्यास असलेले ज्ञानेश्‍वर त्र्यंबकराव लोंढे (वय 50) व दिगांबर दगडोजी गुट्टे (वय 51) हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक मोटारसायकलवरुन (एम.एच.22 ए.आर.7194)  राजगोपालाचारी उद्यानाकडे जात होते. 




यावेळी (एम.एच. 24 ए.एफ 3096) या क्रमांकाच्याकारने या दोघा मोटारसायकलस्वारांना सुपरमार्केटजवळ जोरदार धडक दिली. त्यात दोघे उडाले व रस्त्यावर कोसळले. कार भरधाव वेगाने असल्यामुळे दोघे मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. त्या दोघांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, एकापाठोपाठ दोघांचेही निधन झाल्याची माहिती हाती आली आहे. 





गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते दोघे एकाच मोटरसायकलवरून (क्र.एम.एच.22 ए.आर.7194) नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या बाजूस असलेल्या रस्त्यावरून जात होते. त्याचवेळी राजगोपालाचारी उद्यानाकडून एक कार (क्र. एम.एच.24 ए.एफ. 3096) भरधाव वेगाने येत होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.






Post a Comment

0 Comments