Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/नांदेड येथे शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीस प्रतिबंध केल्यामुळे पोलिसांवर हल्ला, 10 पोलिस जखमी





नांदेड ➡️ नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नव्हती. मात्र, सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान पोलीसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेटिंग तोडली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे. (vnsnews24,crime)







याबाबत अधिक माहिती अशी की, सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सोमवारी (ता. 29) हल्लाबोल मिरवणूक होळीनिमित्त काढण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांनी मिरवणूक काढू नये, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काळ कठीण आहे. त्यामुळे शीख समाजाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतु गुरुद्वाराच्या वतीने परवानगी नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत हल्लाबोलची मिरवणूक काढली. एवढेच नाही तर संतप्त शीख युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स तोडून टाकले, हातात नंग्या तलवारी घेऊन शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. 



शेवटी पोलिस प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता चक्क त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. यात एसपीचे अंगरक्षक दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात स्वत: एसपी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, वजिय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले या हल्ल्यात बचावले. संतप्त जमावाने पोलीस उपअधीक्षक यांची गाडी ही फोडली. चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाइल यावेळी फोडण्यात आले.



शहरात या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण बनले असून हल्लेखोरांची धरपकड सुरु आहे. सध्या शहरात तणावाचे वातावरण बनले असून वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विनापरवानगी हल्लाबोलची मिरवणूक काढून संतप्त शिख तरुणांनी चक्क पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत सहा पोलिस जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर पोलिस अधीक्षकांच्या शासकिय गाडीसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांनाही लक्ष करण्यात आले आहे. पोलिस विभागाकडून धरपकड सुरु असून सध्या वजीराबाद परिसरात तणावाचे वातावरण बनले आहे. (vnsnews24,crime)






Post a Comment

0 Comments