Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

PBN-SAT/ जिंतूर शहरात अवैध शस्त्रे घरात बागळून ठेवणारे आरोपी अटक





जिंतूर ➡️ येथील शहरातील आठवडी बाजार परिसरातील कादरी प्लॉट येथे एका घरात अवैध हत्यारे ठेवणारे तीन आरोपींना स्थानीय गुन्हा शाखानेे 03 मे रोजी रात्री 08 वाजता कार्रवाई करुन अटक केेेेेली आहे. या संंबंधीत जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आले आहे.(vnsnews24, crimmr )   






या संदर्भात स्थानीय गुन्हा शाखाचे पोलिस निरीक्षक व्यंकट रामचंद्र कुसुमे यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे. जिंतूर शहारातील आठवडी बाजार भागातील कादरी प्लॉट येथे एका घरात अवैध हत्यार लपवून ठेवले असल्याची गुप्त माहिती स्थानीय गुन्हा शाखाला मिळाली होती. त्यानंतर दि.03 मे रोजी पोलिसांनी अचानक रात्री 08 ते 9.15 वाजता आरोपी शेख कैफ शेख हबीब यांच्या घरावर छापा टाकला. 




त्या ठिकाणी एक  काळ्या रंगाचा व काळी मूठ असलेला एका बाजूने धारदार व पुढील बाजूने टोकदार असा खंजीर ज्याच्या पात्त्याची लांबी 9.5 इंच व मुठी ची लांबी 0.4 इंच असा एकूण 13.5 लांबीचा ज्यावर काळ्या रंगाचे कापडी कव्हर असलेला जुना वापरतात किंमती 500/- रू आणि एक लोखंडी पात्त्याची तलवार जिची एकूण लांबी 27 इंच मुठी ची लांबी 4 इंच व पात्त्याची लांबी 23 इंच समोरच्या बाजूने टोकदार व निमुळती असलेली जुनी वापरती किमती 1000/- रु.असा माल जप्त केला. 
   





या कार्रवाई मध्ये पोलीस अधीक्षक रागसुधा मॅडम  यांचे आदेशाने व मा. अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे साहेब व पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/ व्यंकट कुसमे, नागनाथ तुकडे,मपोह/ जयश्री आव्हाड,  पोह/ रवी जाधव, विलास सातपुते, पोना/ सिद्धेश्वर चाटे, पोशि/ नामदेव डुबे, राम पौळ, मधुकर ढवळे व केंद्रे  तसेच सायबर सेल येथील पोह/कौठकर  यांचा सहभाग होता.





यासंबंधीत आरोपी 1) शेख  कैफ शेख हबीब 2) सय्यद अवेज अली सय्यद खमर अली दोन्ही रा. कादरी प्लॉट जिंतूर 3) शेख वाजेद शेख साजिद रा.आत्तार गल्ली जिंतूर या तीन आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपीच्या विरोधात विनापरवाना अवैधरित्या धारदार व टोकदार तलवार व खंजीर असे शस्त्रे किमती अंदाजे 1500/- रु.चे ताब्यात बाळगलेले मिळून आले म्हणून 
पोस्टे जिंतूर गुरनं 154/23 क. 4, 25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास मपोह लीला जोगदंड ह्या करीत आहेत.


 




Post a Comment

0 Comments