Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सलग पाचव्यांदा जवाहर विद्यालयातील 7 विद्यार्थीची राज्यस्तरीय कला उत्सवात निवड





जिंतूर ➡️ भारत सरकारने सुरू केलेल्या कला उत्सवात सलग पाचव्यांदा जवाहर विद्यालय जिंतूरचे 7 विद्यार्थी जिल्हास्तर स्पर्धा जिंकून त्यांची निवड राज्यस्तरासाठी झालेली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हास्तरीय स्पर्धेतून विविध गटातून 13 विद्यार्थी निवडले गेले आहेत त्यापैकी 7 विद्यार्थी जवाहर विद्यालय आहेत. 



जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धा दिवाळी सुट्टीत ऑनलाइन पद्धतीने पार पडली असून आज त्याचा निकाल घोषित करण्यात आला आहे. यात 7 विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली असून त्यांची स्पर्धा दि.01 डिसेंबर ते 03 डिसेंबर 2021 दरम्यान औरंगाबाद येथे होणार आहे. 



यात पारंपारिक गायन मध्ये इ.10 वी ची कु.प्राची सुरेश गायकवाड, शास्त्रीय लोकनृत्य मध्ये इ.10 वी ची कु.आदिती अभिजीतराव देशमुख, पारंपारिक लोकनृत्य मध्ये इ.10 वी ची कु.सृष्टी संतोष चौधरी, द्विमितीय चित्र मध्ये इ.10 वी चा हर्षवर्धन शाम शिंबरे, त्रिमितीय चित्र मध्ये इ.10 वी ची कु.साक्षी आनंदराव साबळे, इ.9 वी चा पार्थ प्रतापराव कनकदंडे, तर खेळणी तयार करणे मध्ये इ.10 वी ची कु.प्रांजली राजेश्वरराव घुगे अशा 7 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. 



या सर्व विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी के.डी.वटाणे, प्राचार्य बळीराम वटाणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व स्पर्धकांना कला विभाग प्रमुख प्रदीप कणकदंडे सर,  एस.एस.इंगळे, तबला विशारद रामकृष्ण महाराज दराडे, हस्तकला विभागप्रमुख आसाराम देवकते सर यांनी मार्गदर्शन केले.








Post a Comment

0 Comments