Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतुर तालुक्यातील वडाळी येथे सर्व 45 वर्षा वरील नागरिकांचे झाले 100% लसीकरण




 

परभणी ➡️ जिंतुर तालुक्यातील चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या उपकेंद्र वडाळी येथे आज दि. 27 एप्रिल रोजी कोरोणा लसीकरण शिबीर संपन्न झाले असून 45 वर्षा वरील नागरिकांना 100% लसिकरण पूर्ण झाल्याची माहिती हाती आली आहे. 

बाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला असतांना जिंतुर तालुक्यातील जिंतुर येथुन अवघ्या 7 किमी अंतरावर असलेले परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र चारठाणा अंतर्गत येत असलेले वडाळी गावही त्यातुन सुटले नाही या गावात सातत्याने कोरोणा बाधीत रुग्न आढळून येत असल्याने जिंतुर तहसिल कार्यालयाने या गावाला हाॅटस्पाॅट घोषीत केले. यावेळी आपल्या गावाला या संकटातून वाचवन्या साठी येथिल रा. का. नेते गंगाधर तरटे अप्पा यांनी चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना 100 % कोरोना लसिकरण करण्याचा विडा उचलला. त्यासाठी सतत प्रयत्नात असणार्या रा. का. ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राउत आणि जि. प. सदस्या नानासाहेब राऊत यांच्या मदतीने लसीकरण करण्याचे ठरवले. कोरोणा सारख्या महामारिवर कोणत्याही प्रभावि औषधाचा शोध लागला नसल्याने शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी कोरोणा लसीकरण हाच उपाय असुन सर्व नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन नानासाहेब राऊत यांनी केले. त्यांनी लस उपलब्ध करुन दिल्या आणि आज दि. 27 एप्रिल रोजी कोरोणा लसीकरण शिबीर संपन्न झाले.


यावेळी नानासाहेब राउत, गंगाधर तरटे, कुकडे, गावातील लसिकरण जनजागृतीसाठी नोडेल ऑफिस गजानन कुरे उपस्थित होते.  हा लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ता. वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बोराळकर,चारठाणा येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख. माजीद,डॉ.सुनिल गांजरे,डॉ.जुनेद शेख, डाॅ प्रमिता पाटिल, विजय ढाकने,खके, डोंगरे, नाटकर, ईसाक काझी, येथिल जि. प.शिक्षक ठाकरे, दाभाडे, ढोने,गायकवाड, चौधरी, डोंगरे, सर्व अंगणवाडी कार्यकर्ता, प्रभाकर कुर्हे,मांगिलाल राठोड, काशिनाथ रोकडे, बंडु रोकडे, गजानन पतरवाळे,माणिक जगताप, दत्ता रोकडे, पंडितराव ढोले, गजानन तरटे, मंन्मथ तरटे, नारायण ढोले यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. 





Post a Comment

0 Comments