Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची लस न घेणाऱ्यांच्या विरोधात सक्तीने कारवाई सुरू 







परभणी ➡️  दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणार्‍या ‘ओमिक्रॉन’ या नव्या कोरोना विषाणूचे संंभाव्य संकट पाहता जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही असे  व्यापारी,  वाहन चालक आणि सार्वजनिक ठिकाणी फिरणारे नागरिकांच्या विरोधात सक्तीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल दिले होते. त्यात पंप चालकांना सुद्धा लस घेतलेल्या वाहन धारकांनाचे इंधन उपलब्ध करावे असे निर्देश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होत आहे कि नाही यांची आज 30 नोव्हेंबर रोजी सकाळीच त्यांनी स्वता: परभणी शहरात फिरून पाहणी केली. त्याच्या सोबत महानगरपालिका आयुक्त देविदास पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.





🔸️▪️🔸️▪️🔸️▪️🔸️▪️🔸️▪️🔸️▪️🔸️▪️🔸️▪️🔸️▪️🔸️▪️🔸️






जिल्हाधिकारी आंचल गोयल, आयुक्त देविदास पवार दि. 30/11/2021 रोजी सकाळी 7.00 वा. गांधी पार्क, वसमत रोड, काळी कमान दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते व पेट्रोलपंप याठिकाणी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्रांची तपासणी केली. तसेच ॲटो चालकांना थांबवुन लसीरकण केलेकिंवा नाही प्रमाणपत्रांची तपासणी केली, तसेच बाहेरगावाहुन येणा-या प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. 




परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत परभणी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी परभणी महापालिकेमार्फत शहरातील सर्व दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते व पेट्रोलपंप याठिकाणी सकाळी 7.00 वा. जिल्हाधीकारी आंचल गोयल, आयुक्त देविदास पवार यांनी गांधी पार्क आणी वसमत रोड येथे दुधविक्रेते व भाजीपाला विक्रेते यांचे लसीकरण झाले किंवा नाही याची पाहणी करुन आरटीपीसीआर टेस्टची तपासणी केली.

 




यावेळी जिल्हाधीकारी आंचाल गोयल यांनी स्वत: पेट्रोलपंप, दुधविक्रेते व भाजीपाला विक्रेते यांचे लसीकरण झाले किंवा नाही याची स्वत: तपासणी केली. यावेळी सोबत आयुक्त देविदास पवार तसेच महानरगपालिकेतील अधीकरी व कर्मचारी यांचे वतीन लसीकरण झाले किंवा नाही याची तपासणी करण्यात आली आहे. 




यावेळी आयुक्त देविदास पवार यांनी स्वत: ॲटो चालकांना थांबवुण लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी केलेली आहे. सर्व पेट्रोलपंपावर लसीकरण केंद्र उभारण्यात आले असुन कोव्हीड-19 लसीकरण केल्या शिवाय दि. 1/12/2021 पासुन पेट्रोल पंपामध्ये प्रवेश नाही असे फलक सुध्दा यावेळी लावण्यात आले आहे. तसेच सर्व ठिकाणी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 



तसेच मास्क लावणे बंधनकारक केले असुन या करीता सुध्दा पथकांची नियुक्ती करण्यात आलेली असुन यावेळी सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक, भगवान यादव, मन्तजीब खान, अल्केश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, श्रीकांत कु-हा, विकास रत्नपारखे , लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकळे, आरोग्य विभागाचे समन्वयक गजानन जाधव, नोडल अधीकारी अभिजीत कुलकर्णी, सुनिल झांबरे पथकात होते.






Post a Comment

0 Comments