Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सेलूत एकाच रात्री ठिकाणी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास




सेलू ➡️ शहरातील आत्रेनगर भागातील चार घरात चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. यात अज्ञात चोरांनी एकूण ०१ लाख ४३ हजारांचा माल लंपास केला आहे. यासंदर्भात सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (vnsnews24, crime)





प्राप्त माहितीनुसार शहरातील आत्रेनगर भागातील आवटे दाम्पत्याच्या घरातून रोख रक्कम, मोबाइल, दागिने मिळून १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याबाबत सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.  तर किशोर कुलकर्णी यांचे घरातील १० हजार, योगेश साळेगावकर यांचे घरातील ६ हजारांचे साहित्य तर मनोज खापरखुंटीकर यांचे घरातील १० हजार रुपये असे या तीन घरातूनही २६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.





आत्रेनगर भागातील रहिवासी अनिल आवटे हे पत्नीसह सेलू पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी ६ वा. आले. त्यांनी १४ मे रोजी आम्ही रात्री झोपले होते. आज पहाटे उठल्यानंतर दरवाजा उघडा दिसला. चोरी झाल्याचा संशय आलेल्यामुळे घरात पाहणी केली असता कपाटामधून चोरट्यांनी रोख ५० हजार रुपये, सोन्याचे मंगळसूत्र, मोबाइल आदी १ लाख १७ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला अशी तक्रार पोलिसांसमोर मांडली. त्यानंतर ३ तासांनी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. 



यावेळी आवटे यांचे १ लाख १७ हजारांचा ऐवज तर किशोर कुलकर्णी यांचे घरातील १० हजार, योगेश साळेगावकर यांचे घरातील ६ हजारांचे साहित्य तर मनोज खापरखुंटीकर यांचे घरातील १० हजार रुपये साहित्याची चोरी झाल्याचे पुढे आले आहे. या अनिल आवटे यांचे तक्रारीवरून सेलू पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.  .






Post a Comment

0 Comments