Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/वालूर ते सेलू रस्त्यावर दुचाकी व उसाच्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक





सेलू ➡️ येथील नूतन वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले माणिक सवंडकर हे बोर्डी या आपल्या गावाकडून येताना वालूर ते सेलू रस्त्यावर वालूर नजीक त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची समोरासमोर धडक बसल्याने सवंडकर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री 9.15  वाजण्याच्या सुमारास घडली. (vnsnews-24, feature, selu )  

 



या अपघातातील मयताचे नाव माणिक दामाजी सावंडकर (वय 48 रा.लोकमंगल नगर सेलू (मुळगांव  बोर्डी ता. जिंतूर) असे  असून ते  सेलू येथे नूतन वरिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. रविवारी सुट्टी असल्याने ते बोर्डी गावी दुचाकी (क्रमांक एम.एच 22 ए क्यु 1774) वरून  गेले होते. 




गावाकडून परत येत असताना वालूर ते सेलू या रस्त्यावर वालूरपासून नजीक असलेल्या एका वळण रस्त्यावर उसाचा ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.21 टीई 6922) आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये माणिक सवंडकर यांंचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सेलू उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र शिंदे ,उपप्राचार्य उत्तम राठोड व प्राध्यापक मंडळींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे सेलू व बोर्डी येथे शोकाकुल वातावरण निर्माण झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.



दोन दिवसापूर्वीच या ठिकाणाजवळ तरूणाचा दुचाकी घसरून अपघात झाला होता.  दोन दिवस उलटताच पुन्हा एक ही घटना घडली. रविवारी  रात्री घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ, वालुरचे जमादार एम.एस. जाधव, पो.हे.कॉ गवळी, होमगार्ड  कुरेशी, होमगार्ड निर्वळ आदिनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी  ग्रामीण रुग्णालयात सेलू येथे पाठवण्यात आला. 




अपघातास  कारणीभुत ठरलेल्या ट्रॅक्टरचा हेड आणि अपघातग्रस्त दुचाकी जप्त करून सेलू पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.  उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. मात्र कोणतीही फिर्याद न आल्यामुळे सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. पुढील तपास सेलू पोलिस निरीक्षक आर.जी. गाडेकर हे करीत आहे.







Post a Comment

0 Comments