Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी 14 मार्चपासून जाणार संपावर




परभणी ➡️ जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी हे दिनांक 14 मार्चपासून होत असलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होत असल्याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांना  संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. (vnsnews-24, feature, parbhani ) 




या निवेदनात महाराष्ट्र राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती कर्मचारी यांच्या जिव्हाळाच्या मागण्या दिर्घकाळ प्रलंबीत आहेत. याबाबत मध्यवर्ती संघटना व इतर घटक संघटनांच्या मार्फत शासनाकडे चर्चा व निवेदने सादर करुन सदर प्रलंबीत मागण्यांबाबत सत्वर सकारत्मक निर्णय घ्यावेत. 





यासाठी सततचे प्रयत्न झाले. परंतू आजपर्यंत सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे संदर्भीय निवेदनात नमुद केल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी हे दिनांक 14 मार्च 2023 पासून होत असलेल्या राज्यव्यापी “बेमुदत संप” यामध्ये सहभागी होत आहोत. याद्वारे रितसर सुचना देण्यात येत आहे.





यावेळी विठ्ठल मोरे, जगदीश दुधारे , सतीश रेड्डी, हरीश टाक, शेख अल्ताफ, रोहित जयस्वाल,माधव वडजे, प्रवीण कोकांडे ,महिला प्रतिनिधी शिवकन्या चोपडे , मनीषा भोसले, उज्वला पुलेवाड ,श्रीमती भिसे आदि कर्मचारी उपस्थित होते.   







Post a Comment

0 Comments