Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/मराठी भाषा अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम - डॉ. संजय झुंबाडे





नांदेड ➡️ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय, नांदेड मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना डॉ. संजय झुंबाडे यांनी वरील उद्गार काढले. (vnsnews-24, feature, nanded ) 



माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जागतिकीकरणाच्या रेटयामध्ये मराठी भाषा तग धरून उभी राहिली आहे. मराठी संस्कृती आणि मराठी माणूस यांचे यामध्ये फार मोठे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा मराठी भाषेचे संवर्धन आणि संगोपन करावे व मराठी भाषेला जागतिक दर्जाची भाषा बनवावे; असे ते यावेळी म्हणाले.




लीळाचरित्रापासून सुरू झालेला मराठी भाषेचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यासमोर ठेवला. चक्रधरांनी मराठी भाषेचा घेतलेला कैवार हाच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा गौरव आहे. तिथपासून मराठी भाषेला सुरुवात झाली आणि आज जो वटवृक्ष झाला आहे. त्यामध्ये सर्व लेखक, कवी, अभ्यासक संशोधक आणि विद्यार्थी यांचा फार मोठा वाटा आहे; असेही ते म्हणाले.  






कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप यांनी केले. महाविद्यालयामध्ये विभागाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे उपस्थित होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. यावेळेस कविवर्य कुसुमाग्रज या भिंतीपत्रकाचे  विमोचन करण्यात आले. कु.कांचन अंभोरे व कु.अस्मिता बर्गे यांनी भिंतीपत्रकाचे संपादन केले .




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुध्दमती कदम यांनी केले. कार्यक्रमाला  प्रा.साईनाथ शाहू  व मराठी विभागातील डॉ.विश्वाधार देशमुख प्रा.शिवाजी सूर्यवंशी प्रा.संध्या जाधव हे उपस्थित होते व बहुसंख्य विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments