Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सुयोग इंग्लिश स्कुल व ज्यु. कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा




परभणी ➡️ येथील सुयोग इंग्लिश स्कुल व ज्यु. कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. (vnsnews-24, education, parbhani ) 



या प्रसंगी आयोजितवकार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सिध्दार्थ गवई यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे महत्त्व तसेच मातृभाषेविषयी प्रत्येक व्यक्तीला आदर असावा असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून रश्मी देशमुख यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व व आवश्यकतेबद्दल आपले मत विषद केले. 



तसेच मराठी राजभाषा दिन  अर्थात वि. वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदीन का साजरा केला जातो, याबद्दल विदयार्थ्याना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुजावर अमीन  यांनी तर आभार सुचिता थोरवटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतिया देशमुख, श्रवंती पिंडी, शुभम पाठक, हिराबाई बोरकर यांनी प्रयत्न केले.







Post a Comment

0 Comments