Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  पोखर्णी येथील ट्रॅक्टरच्या रिकाम्या ट्रॉलीला दुचाकी धडकून दोघे जागीच ठार





परभणी ➡️ परभणी ते गंगाखेड महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या रिकाम्या ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना पोखर्णी येथे 25 फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली. (vnsnews-24, feature, parbhani ) 




पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार परभणी - गंगाखेड रस्त्यावरुन परभणीच्या दिशेने दुचाकीवरुन अभिषेक नंदकुमार डहाळे (वय 26, रा. कोमटी गल्ली, परभणी), दत्ता बाबुराव शिंदे (वय 36 वर्ष, रा.साखला प्लॉट, परभणी) हे दोघे ही प्रवास करत होते.



दुचाकी शनिवारी रात्री 10 ते 11 वाजता पोखर्णी परिसरात आली असता समोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या रिकाम्या ट्रॉलीला वाहन धडकून दोन्ही तरुणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची  माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील,  उपनिरीक्षक संजय वळसे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. 




या प्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि नागरगोजे हे करीत आहेत. गंगाखेड परभणी - रस्त्यावर अपघाताची मालिका सुरुच असून मागील तीन दिवसात चार जणांचा मृत्यू तर सहाच्या वर गंभीर जखमी झालेले आहेत. विशेषतः ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे.






Post a Comment

0 Comments