Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी - वसंत हंकारे




जिंतूर ➡️ छत्रपती शिवाजी महाराज समतावादी, विज्ञानवादी, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते शिवाय निर्व्यसनी होते. त्यांनी सदैव रयतेच्या हिताचे रक्षण केले म्हणून तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी केले. (vnsnews-24, feature, parbhani ) 





शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने व्याख्यानाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रताप देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत,अविनाश काळे,गटशिक्षण अधिकारी गणेश गाजरे, बाजार समितीचे सचिव सतीश काळे, रमण तोष्णीवाल, अँड. डी.डी मोरे, पत्रकार विजय चोरडिया,रंजना भोंबे, शालिनी देशमुख, माजी सैनिक बालाजी शिंदे, प्रभाकर लिखे हे उपस्थित होते.


विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सामान्य ज्ञान परिक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.






पुढे बोलताना वसंत हंकारे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज मानवी जीवनांचाच नाही तर प्राण्यांचा अगदी गवताच्या पातीचा मान ठेवणारे महान संवेदनशील राजे होते. महाराजांनी अश्यक्य वाटणारी युद्ध जिंकलीच परंतु युद्धा शिवाय गनिमी कावा शत्रूच्या कल्पने पलीकडचे डावपेज रचले. यावेळी महाराजांनी आपल्या रयतेच्या जिवाचे कुटुंबाचे रक्षण केले म्हणून आजचा प्रत्येक घरातील स्त्रीने आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्याचे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.  




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक अँड. माधव दाभाडे व आभार संजय काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब काजळे, माधव दाभाडे, संजय काळे, सुनील गाडेकर, भगवान रोकडे, संजय गायके, उदय बांगर, अनिल गाडेकर, विजय भांबळे, सारंग आवटे, बाबाराव डोंबे,दामू नवले, अमोल देशमुख, विष्णू गाडेकर, प्रकाश काळे, बापू भांबळे दीपक डोंबे, संतोष काकडे, सोपान धापसे, अनिल दाभाडे, यश रोकडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.









Post a Comment

0 Comments