Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारा निर्भीड असतो - माधव बावगे




नांदेड ➡️ माणसांमध्ये श्रद्धा असावी; पण अंधश्रद्धा नसावी. आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर जग जिंकू शकतो. मिरची लिंबू बांधणे;ही बौद्धिक गुलामगिरी व मनाचे दुबळेपण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारा माणूस निर्भीड असतो. शिक्षणातून चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी व मूल्य परिवर्तन घडले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष श्री. माधव बावगे यांनी केले. (vnsnews-24, education, nanded ) 



यशवंत वार्षिक युवक महोत्सव: २०२३ च्या उद्घाटन सोहळ्यात दि.२२ फेब्रुवारी रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर माजी राज्यमंत्री व संस्थेचे सचिव डी.पी. सावंत, सुप्रसिद्ध कथाकार व कादंबरीकार प्रा.मनोज बोरगावकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, युवक महोत्सव समितीचे समन्वयक डॉ.महेश कळंबकर यांची उपस्थिती होती. 

 




सोहळ्याचे उद्घाटक माजी राज्यमंत्री व संस्थेचे सचिव डी.पी. सावंत म्हणाले की, देशासाठी आपण काय करू शकतो; याचा विचार प्रत्येक नागरिकांनी करावा. आपण चांगले नागरिक कसे बनू, हा प्रश्न सदोदित मनात असावयास हवा. आज आपल्या गरजांना आळा घातला पाहिजे. जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानले पाहिजे; तरच चुकीचे काही घडणार नाही. अवैध मार्गाने मिळविलेले यश फार काळ टिकत नाही. देशहितासाठी कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करावयास हवे.

 




थोर वैज्ञानिक सी. व्ही.रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या सोहळ्याचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. महेश कळंबकर यांनी केले. प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रा.मनोज बोरगावकर यांनी, आज माणसं इंटरनेटने जोडल्या गेली; मात्र नात्यांनी तुटलेली आहेत. आपण आपला चेहरा हरवत चाललो आहोत. निसर्ग, माणसं व पुस्तक सदैव वाचली पाहिजे. माणसाने अहंकार बाळगला नाही तर कधीच तो खाली पडणार नाही. स्त्रियांच्या मनातील दुःख समजून घेणे हाच खरा पुरुषार्थ आहे तसेच भारताची संस्कृती वंचितांनी जपलेली आहे; असे प्रतिपादन त्यांनी केले.




अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, यशवंत वार्षिक युवक महोत्सव हा ज्ञानोत्सव आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागावी आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करण्यासाठी तो सुसज्ज व्हावा; हा हेतू या युवक महोत्सवाच्या पाठीमागे आहे. आपल्या ज्ञानामध्ये सदैव भर पडली पाहिजे. त्या दिशेने आपला प्रवास हवा. समाजउपयोगी शोध लावणे व आपल्या ज्ञानाने सर्वसामान्य माणसाचे जीवन सुधारण्यासाठी मदत व्हावी; असे प्रतिपादन त्यांनी केले.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ.संजय ननवरे, प्रा.गौतम दुथडे, उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.व्ही.सी. बोरकर, डॉ.एल.व्ही. पदमारानी राव, प्रा.संगीता चाटी, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.मनोज पैंजणे, डॉ.अजय गव्हाणे, प्रा.डॉ.मंगल कदम, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ.विजय भोसले, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.साहेब शिंदे, डॉ.बी.बालाजीराव, डॉ.बालाजी भोसले, डॉ.संदीप पाईकराव, डॉ. साईनाथ शाहू, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.धनराज भुरे, डॉ.रमेश चिल्लावार, डॉ.राजकुमार सोनवणे, डॉ.मीरा फड, डॉ.रामराज गावंडे, डॉ.भरत कांबळे, डॉ.सुरेश तेलंग, डॉ.अर्चना गिरडे, डॉ. अंजली जाधव, डॉ.प्रवीण मिरकुटे,डॉ. वीरभद्र स्वामी, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रा.आमिर खान, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, संजय भोळे आदींनी परिश्रम घेतले.







Post a Comment

0 Comments