Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ शिक्षणाचा उपयोग समाजकल्याणासाठी करावा - डॉ.अभिजित चिद्रवार




  • इ.10 वी व इ.12 वी च्या निरोप समारंभात व्यक्त केले मत
  • सर्व विद्यार्थ्यांनी घेतला स्नेहभोजनाचा आनंद

जिंतूर ➡️ आज जवाहर विद्यालयात इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी के.डी.वटाणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मोरया हॉस्पिटलचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अभिजीतराव चिद्रवार, सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथपंत खापरखुंटीकर, अनिल कुलकर्णी, संचालक किशनराव वटाणे, प्राचार्य बळीराम वटाणे व्यासपीठावर उपस्थित होते.





प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष कै.दादासाहेब वटाणे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर संगीत विभागातर्फे मान्यवरांचे स्वागत समूहगीत गायनाने केले. तसेच सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथपंत खापरखुंटीकर सर व अनिल कुलकर्णी सर यांचा सपत्निक सत्कार  विद्यालयातर्फे करण्यात आला.




यानंतर प्राचार्य बळीराम वटाणे सरांनी प्रास्ताविक सादर केले. यात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाचा सराव तसेच शाळेतून ज्या संस्कारमय गोष्टी दिल्या त्या जोपासाव्यात असे आपले विचार व्यक्त करीत असतांना सांगीतले.





यानंतर इयत्ता 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात इ. 9 वी ची कु.संचिता गजानन वाघ, कु.भक्ती भीमराव नागरे, इ.10 वी च्या कु. सुमेधा मधुकरराव खापरे कु. सांची दशरथ खिल्लारे, कु.ऋतुजा रविंद्रकुमार पतंगे, अमर शंकरराव मोरे, बालाजी राठोड यांनी आजपर्यंतच्या शाळेतील शिक्षकांविषयी तसेच विविध विभागामधून मिळालेल्या अनुभवांचा दाखला देत भावनिक मनोगत व्यक्त केले. 





यानंतर प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ डॉ.अभिजीतराव चिद्रवार यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षणाचा उपयोग समाजकल्याणासाठी करावा तसेच कोणत्या दिशेला जायचं हे अभ्यास करून ठरवावं आणि जवाहर विद्यालयाचे विद्यार्थी कुठल्याही कामात कमी पडणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी मनोगतातून इ.10 वी व 12 वी तून प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोरया फाउंडेशन कडून 11,000 रू.रोख रक्कम बक्षीस जाहीर केली.





यानंतर सेवानिवृत्त शिक्षक अनिल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोबाईल पासून दूर राहण्याचा अनमोल सल्ला देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर या विद्यालय चे अध्यक्ष  के.डी.वटाणे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी विचार सांगताना शुभेच्छा दिल्या.





या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण भोसले यांनी केले तर आभार प्रदीप चव्हाण यांनी मांडले. तसेच भाषणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले परिश्रम घेतले.








Post a Comment

0 Comments