Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  रस्त्यावरील दुचाकी व बसच्या अपघातात आजोबा व नातु जागीच ठार





परभणी ➡️ गंगाखेड जवळील मालेवाडीपाटी जवळ आज सकाळी 9.30 वाजता बस व मोटार सायकलचा समोरासमोर झालेल्या मोठा अपघात मोटर सायकलवरील आजोबा व नातू हे दोघेजण जागीच ठार झाले आहेत. (vnsnews-24, accident, parbhani ) 




पालम तालुक्यातील रावराजुर येथून गंगाखेडकडे दुचाकी वरून निघालेल्या शिवाजी किशनराव शिंदे व श्रीनिवास कल्याणराव शिंदे राहणार रावराजुर तालुका पालम हे दोघेजण आपल्या गावाकडून गंगाखेडकडे निघाले असता गंगाखेड जवळील मालेवाडी पाटीजवळ आज दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता कळंब कडून नांदेड कडे जाणारी बस मालेवाडी पाटील जवळ आली असता दुचाकी व बसचा भीषण अपघात झाला.





या भीषण अपघातामध्ये आजोबा शिवाजीराव किशनराव शिंदे (70) व नातू श्रीनिवास कल्यानराव शिंदे (19) हे या अपघातात जागीच ठार झाले आहेत. या घटनेची माहिती गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी ही माहीती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त मयत व्यक्तींना तात्काळ अंबुलन्स बोलावून त्याच्य साह्याने मयतास गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.







Post a Comment

0 Comments