Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ एरंडेश्वर येथील शिक्षक प्रेमेंद्र भावसार यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित




परभणी ➡️ राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीड़ा विभागाच्या वतीने राज्य निवड समितीच्या शिफारशीनुसार सन 2021-22 चे राज्यातील विविध प्रवर्गातील गुणानुक्रमे 108 शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहिर झाले होते. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे (दि.24) फेब्रुवारी रोजी पार पडला. (vnsnews-24, education, parbhani ) 




यामध्ये जिल्ह्यच्या माध्यमिक विभागातुन पुर्णा तालुक्यातील  एरंडेश्वर येथील जिल्हा परिषद प्रशालाचे प्रेमेंद्र प्रकाशराव भावसार यांना  पर्यटन, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास विभाग मंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविन्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव  रणजीतसिंह देओल, दीपाली भावसार, उत्कर्ष भावसार, जिज्ञासा भावसार आदिंची उपस्थिती होती.





माध्यमिक शिक्षक प्रेमेंद्र भावसार यांनी जिल्ह्यात इंग्रजी अध्यापन, अध्ययनासाठी सुपरचित, लेखक, कवी आणि राज्यस्तरावर विविध प्रशिक्षणासाठी रिसोर्स पर्सन म्हणून काम केले. निवडणूक आयोगाच्या स्वीप मतदान जनजागृती मध्ये उत्कृष्ट काम केले.तसेच यावर्षीची वैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या सर्व माहितीसह संपूर्ण वर्षाचे वैज्ञानिक दिनदर्शिका त्यांनी स्वतःहून तयार केली आहे. 





जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावे या उद्देशाने भावसार यांनी जिल्ह्यात इंग्रजीचा राबवलेला उपक्रम विद्यार्थ्यांसाठि दिशादर्शक ठरला आहे. प्रेमेंद्र भावसार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.








Post a Comment

0 Comments