Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त रणजीत पाटील यांची औरंगाबादला बदली





परभणी ➡️  शहर महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त रणजीत अण्णासाहेब  पाटील यांची पदोन्नतीने औरंगाबाद महानगरपालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी बदली झाली. याबद्दल परभणी महापालीकेच्यावतीने  शुक्रवारी (ता.24) त्यांना आयुक्त यांच्या दालनात निरोप देण्यात आला.(vnsnews-24, gov, parbhani ) 





महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त असलेले रणजीत पाटील यांनी यापुर्वी शहरात विविध पदांवर कार्य केले आहे. यापुर्वी त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून कार्य केले असून त्यापुर्वी ते परभणी महानगरपालिकेत देखील उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांची बदली मुंबई मंत्रालयात झाली होती. तेथून कुलसचिव पदाचा पदभार घेतल्यानंतर दोन दिड-दोन वर्षापुर्वी ते महापालिकेत अतिरीक्त आयुक्तपदी नियुक्त झाले होते. गुरुवारी (ता.23) त्यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले होते. शुक्रवारी (ता.24) सायंकाळी महापालिकेत त्यांचा सत्कार करण्यात आला. 




यावेळी आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त मनोज गग्गड, नगररचना सहाय्यक संचालक किरण फुटाणे, शहर अभियंता वसिम खान पठाण, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मिर्झा तनवीर बेग, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, सहाय्यक आयुक्त जुबेर हश्मी, नगरसचिव विकास रत्नपारखे, सहाय्यक लेखाधिकारी भगवान यादव, भांडार विभागाचे रामेश्वर कुलकर्णी, माहीती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, विद्युत अभियंता सोहेल सिद्दीकी, अभियंता पवन देशमुख, युवराज साबळे, मोहम्मद मुन्नवर, लेखाधिकारी अमोल सोळंके, मुकुंद कदम,   आदी उपस्थित होते.





यावेळी बोलताना आयुक्त सांडभोर यांनी सांगीतले की,श्री.पाटील यांचे उच्च शिक्षण परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात झाले. जिथे शिक्षण झाले तिथे नोकरी नको अशी मानसिकता असते. परंतु पाटील हे अपवाद ठरले. त्यांनी परभणीत नियुक्ती स्वतहुन घेतली.यापुर्वी ते 2016 ला परभणी महापालीकेत उपायुक्त होते.त्यानंतर कृषि विद्यापीठात कुलसचिव तीन वर्ष काम केले.परभणी महापालीकेत 2 वर्ष अतिरिक्त म्हणून काम केले.त्यांच्या अनुभवाचा फायदा मनपाला झाला.त्यांनी या ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांची बाजु घेत होते.त्यांना कामकाजाचे बारकावे शिकवत होते.औरंगाबाद मनपात देखील त्यांची काम करण्याची शैली राहील.ते लवकरच आयएएस होतील,त्यासाठी त्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





सत्काराला उत्तर देताना श्री.पाटील यांनी सांगीतले की,मंत्रालयात 1997 मध्ये काम केले.25 वर्ष सेवेचा अनुभव आहे.महसुल,म्हाडात काम केले.सुनावनीच्या कामाचा अनुभव आहे.त्यानंतर मुंद्राक विभागात काम केले.परभणी महापालीका 2011 ला नविन झाली असताना जून 2014 ला मनपात काम केले.अनुभवी अधिकारी-कर्मचारी कमी होते.मधल्या फळीतील अधिकारी-कर्मचारी चांगले होते.परंतु त्यांच्या केडर मध्ये बदल्या झाल्या.2014 ते 2016 मध्ये उपायुक्त होते.पुन्हा मंत्रालयात गेलो.2017 ते 2019 पर्यंत म्हाडा विभागात तर ज्या विद्यापीठात शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम केले.तक्तालीन आयुक्त देविदास पवार यांचे सहकार्य लाभले.निवडणुक काळात वार्ड रचना तयार केली.यावेळी किरण फुटाने यांच सहकार्य लाभले.




यावेळी उपायुक्त मनोज गग्गड, नगररचना सहाय्यक संचालक किरण फुटाणे, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत,शहर अभियंता वसिमखान पठाण,यांत्रीकी विभाग प्रमुख तन्वीर मिर्झा बेग,प्रसिध्दीप्रमुख राजकुमार जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नगर सचिव विकास रत्नपारखे यांनी सुत्रसंचलन केले.





तसेच  मनपाच्या अधिकारी-कर्मचारी संघटनेच्यावतीने श्री पाटील यांचा त्यांच्या दालनात  युनीयन नेते के.के.आंधळे,अध्यक्ष नजम खान,सचिव विकास रत्नपारखे,मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड,रेंगे,उमेश जाधव,अभिजित कुलकर्णी,मनोज खानापुरकर,सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक,माहीती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव रोखपाल भागवत,स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुऱ्हा, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी,रंगनाथ गरुड,नारायण सोनटक्के,बनसोडे आदींनी पाटील यांचा सत्कार केला.




Post a Comment

0 Comments