Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रसार माध्यमांचा वापर करावा - सीईओ रश्मी खांडेकर




परभणी ➡️ तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी साठी प्रसार माध्यमाचा वापर करावा अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी संबंधितांना दिल्या आहेत. (vnsnews-24, gov, parbhani ) 






शुक्रवार दि 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समिती त्रैमासिक बैठक जिल्हा परिषदेत संपन्न झाली.






कोटपा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांनी कार्यवाही करावी तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखु व तंबाखूजन्य पदार्थ  खाऊन थुंकणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तंबाखु मुक्त शाळा करण्याचे आदेश शिक्षण विभागास देण्यात आले.  




तसेच तालुकास्तरीय समन्वय समित्या स्थापन कराव्यात यासाठी संबंधित तालुक्यातील गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ह्या समित्या स्थापन करून घ्याव्यात अश्या सूचना रश्मी खांडेकर यांनी दिल्या.




महानगर पालिकेच्या घंटा गाडीवर तंबाखु विरोधी धून वाजवून प्रसार करावा असे रश्मी खांडेकर यांनी सूचित केले. सदर बैठकीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, गृह उपअधीक्षक प्रकाश राठोड, डॉ. रावजी सोनवणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी विभागाचे प्रशांत शिंदे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. टी. आर फिसफिसे  उपस्थित होते. जिल्हा तंबाखु नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय परभणीचे डॉ. रुपाली रणवीरकर व मानसतज्ञ केशव गव्हाणे यांनी माहिती सादर केली.





तसेच मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे अभिजीत संघई यांनी तालुका स्तरीय समन्वय समिती व तंबाखु मुक्त शाळा बाबतचे निकषां विषयी माहिती सांगितली.









Post a Comment

0 Comments