Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/सुयोग इंग्लिश स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याना निरोप





परभणी ➡️ शांती नगर येथील सुयोग इंग्लिश स्कुल व ज्यु कॉलेजच्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्याना निरोप समारंभ देण्यात आला. (vnsnews-24, feature, parbhani ) 



या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री समर्थ खटकेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. ज्ञानोबा मुंढे होते. यावेळी संस्थेच्या कोषाध्यक्ष श्रीमती पुष्पा मुंढे त्याचबरोबर प्राचार्य सिध्दार्थ गवई यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन आणिे पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. 





अध्यक्षीय भाषणात डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी विद्यार्थ्याना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त, वेळेचं नियोजन, आई वडीलांच्या  कष्टाची जाणीव ठेवणे आणि प्रामाणिकपणाच महत्व विषद करत विद्यार्थ्यानी परिक्षेला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शक केले 







त्याचबरोबर उत्तरपात्रिका लेखन, समयसुचकता  आणि सुवाच्छ हस्ताक्षर याबद्लची सुचना दिल्या.  पुष्पा मुंढे यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांनावर चांगले संस्कार होत असतात म्हणून आपण सुशिक्षित होत असताना सुसंस्कारीत होणे सुध्दा गरजेचं असंत असं प्रातिपादन केले. विद्यार्थ्यांनी परिक्षा झाल्यानंतर आयुष्याच्या नवीन क्षेत्रात पदार्पण त्याचबरोबर इतकी वर्षे सोबत असलेली शाळेची साथ आता सुटणार याची मनामध्ये खंत आणि दु:ख त्यांच्या भावनांतून व्यक्त केले. 





कार्यक्रमाच सुत्र संचालन आमीन मुजावर यांनी तर आभार प्रदर्शन नारायण सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतिया देशमुख, रेश्मी देशमुख, आर्शिया पठाण, सुचिता थोरवटे, विशाखा कोनार्डे, श्रवंती पिंडी, शुभम पाठक, योगेश गायकवाड, हिराबाई बोरकर यांनी प्रयत्न केले.













Post a Comment

0 Comments