Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ प्री-वेडिंग शूट बंद करा या महासभेच्या आवाहनाला जिंतूर येथील समाज बांधवाकडून मोठा प्रतिसाद




जिंतूर ➡️ महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या प्रि वेडिंग शूटिंग बंद करा. या आवाहनाला जिंतूर येथे मोठा प्रतिसाद मिळाला तसेच समाजाची स्वतंत्र जनगणना नोंदणीचां प्रारंभ राज्य अध्यक्ष  नंदकुमार गादेवार यांच्या हस्ते करण्यात आला. (vnsnews24, feature ) 



महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या  राज्यस्तरीय संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभेत नुकत्याच घेतलेल्या  प्री-वेडिंग शूटिंग या वाढत्या पद्धतीला बंदी घेण्याचा ठराव पारित केला होता. यासाठी केलेल्या आवाहनाला राज्यभरासह जिंतूर येथेही मोठा प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जिंतूर तालुका पदाधिकारी पदग्रहण सोहळ्यानिमित्त एका विशेष कार्यक्रमात हा विश्वास समाज बांधवांनी दिला. दरम्यान आर्य वैश्य समाजाची जनगणना प्रारंभ करण्यात आली.




येथील नगरेश्वर मंदिर येथे 4 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जिल्हा बैठक तालुका कार्यकारणी पदग्रहण सोहळा गरीब व होतकरू विधवा  परित्यकत्या  महिलांना पिठाची गिरणी वाटप करण्याचा कार्यक्रम झाला. परभणी जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती संचालक पोलीस पतपेढी चेअरमन संचालक आदींचा सत्कार, समाजाच्या जनगणनेचा प्रारंभ करण्याचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार उपस्थित होते. यावेळी विशेष उपस्थिती महेश महाराज जिंतूरकर, प्रमुख पाहुणे म्हणून भानुदास राव वट्टमवार पुणे, सुधीर पाटील परभणी,  सुमित रुद्रवार बीड, बालाजी डूबेवार परभणी, किरण वट्टमवार, सखाराम चिद्रवार, विशाल नारलेवार, रमेश पेकम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


प्रारंभी श्री कन्यका परमेश्वरी मातेचे व संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली याचवेळी  समाजाचे कुलगुरू दिवंगत भास्कराचार्य महाराज बोधनकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.




मार्गदर्शन करताना गादेवार यांनी विवाह समारंभात  प्री-वेडिंग शूटिंग करून वाढत्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करून या प्री-वेडिंगला समाजातील बांधवांचा नकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेऊन राज्याच्या सर्वसाधारण सभेत नुकताच बंदी बाबत ठराव पारित करण्यात आला होता.



त्या अनुषंगाने उपस्थित समाज बांधवांना त्यांनी संबोधित करून प्रश्न उपस्थित केला. तेव्हा समाज बांधवांनी प्री-वेडिंग करू नका असे सांगत या आव्हानाला प्रतिसाद दिला दरम्यान महासभेच्या वतीने गरजवंत 17 महिला लाभार्थ्यांना गिरणी वाटप करण्यात आले. जिंतूर तालुका महासभेच्या नूतन पदाधिकारी पदग्रहन शपथ देण्यात आली. 



मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली प्रस्ताविक प्रदीप कोकडवार संचलन स्वप्निल येरमवार तर आभार प्रदर्शन आदित्य कोकडवार यांनी केले. जिल्हाभरातील महासभेचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील लाभार्थी यावेळी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments