Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पदवीधर निवडणुकीत 78 केंद्रांवर 32 हजार 715 नागरिक बजावणार मतदानाचा हक्क - जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर





परभणी ➡️ औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात मतदानाची प्रक्रिया घेण्यात येणार आहे. एकूण 78 केंद्रावर 32 हजार 715 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 परभणीत जिल्ह्यात 6 हजार 770 महिला व 25 हजार 945 पुरुष असे एकूण 32 हजार 715 मतदार झाले आहेत. यांमध्ये सर्वाधिक 13 हजार 483 मतदार परभणी तालुक्यातील आहेत. 2014 च्या पदवीधर निवडणुकीत एकूण 26 हजार 354 मतदार होते. त्यावेळी 35.22 टक्के मतदान झाले होते. यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. व्यापक प्रमाणावर जनजागृतीही केली जात आहे. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, नानासाहेब भेंंडेकर यांची उपस्थिती होती.

सर्व मतदान केंद्रांवर अत्यावश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. सर्व केंद्र निर्जतुक करण्यात येणार आहेत. तसेच कोविडच्या अनुषंगााने सर्व मतदान अधिकारी-कर्मचारी यांना मास्कचा पुरवठा करुन सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनींग, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करुन घेण्यात येणार आहे. जिल्हा कचेरीत मतदान साहित्य वाटपासाठी 10 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. 30 क्षेत्रीय अधिकारी, 67 रुट गाईड, 380 मतदार अधिकारी व कर्मचारी, 100 सुक्ष्म निरीक्षक, 12 आरोग्य नोडल अधिकारी, 156 आरोग्य कर्मचारी या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व केंद्रांवर चित्रीकरण केले जाणार आहे. 78 मतदान केंद्रांवर जाणार्‍या सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतपेट्या असलेली वाहने व मतदान पथकाच्या वाहनास जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

मतदान संपल्यावर सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमा करुन ठेवल्या जाणार आहेत. नंतर त्या औंरंगाबाद येथे विभागीय कार्यालयातील स्ट्रॉेंग रुमकडे रवाना करण्यात येतील. औंरंगाबाद येथे दिनांक 3 डिसेंबरला मतमोजणी करुन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 मतदानानिमित्त  मद्यविक्री बंद

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवून अनुचित प्रकार घडू नये याकरीता मतदानाच्या 48 तास पुर्वी दि.29 नोव्हेंबर 2020, मतदान पुर्वीचा दिवस दि.30 नोव्हेंबर आणि मतदानाचा दिवस दि.1 डिसेंबर 2020 या तीन दिवशी  मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन परभणी महानगरपालिका, परभणी हद्दीतील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-3 देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-2 सीएल,एफएल,टिओडी-3, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-3 परवाना कक्ष व एफएल,बीआर-2, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री करण्यास बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारका विरुध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे. असेही आदेशात नमुद केले आहे.      




Post a Comment

0 Comments