Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/श्री शिवाजी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा





परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील मराठी आणि संगीत या  विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (ता.२७) रोजी कुसुमाग्रज जयंती आणि मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. (vnsnews-24, feature, parbhani ) 

 




कार्यक्रमाचे उदघाटन उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर मराठी विभागप्रमुख डॉ.प्रल्हाद भोपे,डॉ.राजू बडुरे, संगीत विभागप्रमुख प्रा.सविता कोकाटे यांची उपस्थिती होती. यावेळी मराठी मातीचे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. मजद्यावे एकदंता, केव्हा तरी पहाटे, ही मायभूमी ही जन्मभूमी, कानडा राजा पंढरीचा, लाभले आम्हास भाग्य, नभातले तारे आदी गीते प्रा.अंकुश खटिंग, अभिरुपा पैंजणे, प्रतीक कदम, गायत्री सांगेकर, आरती महामुने, संजीवनी भोसले, मुक्ता कच्छवे, रामदास कुलकर्णी, कृष्णा शिनगारे या विद्यार्थ्यांनी सादर केले.




यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या तसेच स्व-रचित कवितांचे  वाचन साक्षी कदम, वैभव शेटे, संदीप कावळे,  स्नेहा डहाळे, शीला देशमुख, दूर्वा सावने, नारायण आडे, नालंदा टेकाळे, वैष्णवी जवंजाळ आदी विद्यार्थ्यांनी केले. यावेळी पूजा घोंगडे, मयुरी शिंदे यांनी तयार केलेल्या कुसुमाग्रजांच्या वाडमयावर प्रकाश टाकणाऱ्या भितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांनी केले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी कदम हिने केले तर आभार मोनिका गंगथरे हिने मानले. सदरील कार्यक्रमास डॉ. संजय जाधव,प्रा.स्वाती देशमुख, प्रा.अहिल्या शेटे, प्रा.तेजस्विनी कपाटे, प्रा.अतुल समिंद्रे, प्रा.अनिल बडगुजर, प्रा.अंकुश खटींग, बळीराम कौसाइतकर  आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमास मराठी विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments