Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/वसंतराव नाईक पुतळ्याचे सुशोभिकरणासह फलक दुरुस्ती करा; विविध सामाजिक संघटनांचा आंदोलनाचा इशारा





जिंतूर ➡️ शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पुतळा परिसराची तसेच व्यापारी संकुलची सध्या मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ :०० वाजता नगरपरिषद जिंतूर येथे निवेदन देण्यात आले. (vnsnews-24, feature, jintur) 





दरम्यान पुतळा परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वसंतराव नाईक पुतळ्याचे नामफलक मागील अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत होते. काही दिवसांपूर्वीच हे फलक उतरवण्यात आलेले आहे. याचबरोबर पुतळ्याला लावलेल्या उठ्यावरील फरशीची देखील दूर अवस्था झाली आहे. पुतळा परिसरात नवीन फरशी बसवण्यात यावी. हटवण्यात आलेल्या नाम फलक तात्काळ बसवण्यात यावे. 





वसंतराव नाईक यांच्या पुतळ्या समोरील विजेचा खांब व त्यावरून जाणारी विद्युत वायर काढण्यात यावे. परिसराची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी जिंतूर शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिली मात्र आतापर्यंत या मागणीची कसलीही दखल घेण्यात आली नाही. या पुतळा परिसरातील स्वच्छता करून सुशोभीकरणाचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने येणाऱ्या पंधरा दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा गोर सेना, वसंतराव नाईक संघर्ष सेना व बंजारा कर्मचारी संघटना जिंतूर च्या वतीने देण्यात आला.





सदरील निवेदनावर विजय आडे (गोरसेना तालुकाध्यक्ष), सचिन राठोड (शहराध्यक्ष),  सचिन आडे वसंतराव नाईक संघर्ष सेना, डी.यु राठोड बंजारा कर्मचारी संघटना, चव्हाण बी एल सर, पंकज चव्हाण, आदित्य राठोड, संतोष राठोड, संतोष आडे साईनगर तांडा सरपंच, शिवाजी राठोड, दीपक चव्हाण (सरपंच सोनापूर तांडा), अनिल जाधव, वसंत आडे, पवन चव्हाण व राठोड सुनील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







Post a Comment

0 Comments