परभणी विशेष पथकाद्वारे कारवाई |
परभणी ➡️ गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगांव येथील गुंजेगाव टी-पॉइंटवर विशेष पथकाने केलेल्या कारवाईत 44 हजार 20 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. त्या पाठोपाठ या पथकाने लोहा (जि. नांदेड) व परळी (जि. बीड) या ठिकाणी छापेमारी करीत एकूण 63 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या संदर्भात एकूण 09 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.
याबाबतची पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 29/11/2021 रोजी पोलीस ठाणे पिंपळदरी हद्दीत मौजे राणीसावरगांव येथे सापळा रचुन महेश मनोहर बलसेटवार (रा. अंबेवेस गल्ली ता. परळी) याला ताब्यात घेतले. सदर आरोपी जवळ 44 हजार 20 रुपयांचा गुटखा मिळून आला. त्याच्या विरूध्द पोलीस ठाणे पिंपळदरी येथे गु.र.नं 158/2021 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास करीत असतांना वरिल अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून विचारपूस दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक जयंत मीना साहेबांचे व अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व उप विभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड श्रेणीक लोढा यांचे मार्गदर्शना खाली उप विभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड श्री. श्रेणीक लोढा यांचे यांचे पथकाने राणीसावरगाव, लोहा, परळी येथे छापेमारी करून एकूण 63 लाखांचा गुटखा पकडला आला.
या गुन्ह्यात एकूण 1) ज्ञानेश्वर मारोती शिंदे, वय 35 वर्षे, रा.राणीसावरगांव ता गंगाखेड, 2) यादव सुर्यकांत चव्हाण, वय 35 वर्षे, रा.लोहा, जि.नांदेड, 3) लतीफ महमद शेख, वय 38 वर्षे, रा. लोहा, जि.नांदेड, 4) योगेश नितीन यादव, वय 21 वर्षे, रा. लोहा, जि.नांदेड, 5) राजेश आनंदराव चव्हाण, 26 26 वर्षे, रा. लोहा, जि.नांदेड, 6) महेश मनोहर वलशेटवार, वय 30 वर्षे, रा.परळी, जि.बीड, 7) मोईनलाल बन्सीलाल पल्लोड, वय 56 वर्षे, रा.पदमावती गल्ली, परळी, जि.बीड, 8) वामन बालाजी जाधव, वय 30 वर्षे, रा.राणीसावरगांव ता गंगाखेड, 9) अमोल बालाजी जाधव, वय 27 वर्षे, रा.राणीसावरगांव ता गंगाखेड अशा एकूण 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
0 Comments