Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ 'यशवंत'चे प्राचार्य व माजी प्र- कुलगुरू डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांना 'इलेक्ट्रॉनिक्स'मध्ये दुसऱ्या पेटंटची प्राप्ती





नांदेड ➡️ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांना इलेक्ट्रॉनिक्स या विषयात ' इलेक्ट्रॉनिकली टुयनेबल थर्ड ऑर्डर स्विचड कॅपॅसिटर फिल्टर कन्फग्रेशन विथ फीड फॉरवर्ड सिग्नल टू मिनिमाईज ओव्हरशूट' या पेटंटची प्राप्ती झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स या विषयात मराठवाड्यात दुसऱ्यांदा हे पेटंट प्राप्त झालेले आहे. पहिले पेटंट डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनाच गतवर्षी जून महिन्यात प्राप्त झाले होते.




पेटंट कार्यालय, नवी दिल्ली, भारत सरकार यांनी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयातील अथक संशोधन व परिश्रमाला पेटंटची मान्यता रीतसर पेटंटपत्र व प्रशस्तीपत्र पाठवून  दिलेली आहे. उत्कृष्ट प्रशासक म्हणून कार्य करीत असतांना देखील अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचा ध्यास न सोडलेले प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या या संशोधकीय योगदान व प्राप्तिबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 





प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देखील त्यांनी प्रशासकीय आणि शैक्षणिक कौशल्यावर प्राप्त केलेला आहे. जगातील विविध १७ देशांना शैक्षणिक भेट दिलेल्या प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी शिक्षण हे 'विद्यार्थी केंद्रित' असावे;हे ध्येय उराशी बाळगून विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणूनही कुशल सेवा पार पाडलेली आहे.





आजवर दोन महाविद्यालये इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको  आणि यशवंत महाविद्यालयास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार त्यांच्या नियोजन आणि व्यवस्थापनामुळे प्राप्त झालेला आहे तसेच भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून जिल्हा ग्रीन चॅम्पियन आवार्ड त्यांनी'  यशवंत ' ला प्राप्त करून दिलेला आहे.



प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या या उत्तुंग यशाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकरावजी चव्हाण, उपाध्यक्षा माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण, सचिव माजी पालकमंत्री डी. पी.सावंत, सहसचिव ॲड. उदयरावजी निंबाळकर, कोषाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य माजी प्राचार्य डॉ.बी.एस.ढेंगळे, श्री पांडुरंगराव पावडे, श्रीजया चव्हाण, सुप्रसिद्ध उद्योजक नरेंद्र चव्हाण, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका व इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव, संशोधन आणि विकास कक्षाचे समन्वयक डॉ.एम.एम.व्ही.बेग, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ.अजय गव्हाणे आदींनी अभिनंदन केले आहे.



या सुयशाबद्दल शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने कार्यकारणी सदस्य श्रीजया चव्हाण यांनी सत्कार केला. याप्रसंगी कार्यालय प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींची उपस्थिती होती.





Post a Comment

0 Comments