Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री शिवाजी महाविद्यालयाचा आज पदवी वितरण कार्यक्रम; विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन





परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचा पदवी-पदव्युत्तर उत्तीर्ण  विद्यार्थ्यांसाठी २५ वा पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आज (सोमवार) सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. (vnsnews24, feature ) 

 





या कार्यक्रमासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्यासह उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, परीक्षा प्रमुख डॉ.शेख एम.ए.रेहमान यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.




सदरील कार्यक्रमात जे विद्यार्थी उन्हाळी-२०२२ परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत तसेच ज्यांनी पदवी प्रमाणपत्र प्रत्यक्ष घेण्यासाठी विद्यापीठास विहित नमुन्यात आवेदन पत्र सादर केले आहेत अशा विद्यार्थ्यांना सदरील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. तरी अशा विद्यार्थ्यांनी आज १० वाजेपर्यत महाविद्यालयात येऊन रवींद्र तिळकरी, कालिदास भागडे, रवी कावळे यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी करावी असे आवाहन परीक्षा प्रमुख डॉ.शेख एम.ए.रेहमान यांनी केले आहे.







Post a Comment

0 Comments