Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ नागरिकांनी व्यापक प्रमाणात ग्राहक पंचायती जनजागृती करावी - तहसीलदार सखाराम मांडवगडे





जिंतूर ➡️ तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून आज 23 डिसेंबर रोजी ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष तहसीलदार सखारामजी मांडवगळे यांनी मार्गदर्शन नागरिकांनी ग्राहकपंचायतची जनजागृती मोठ्या प्रमाणात करावी असे मत व्यक्त केले.

 



सदरील कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष गुलाबराव शिंदे, सचिव मंचकराव देशमुख ,उपाध्यक्ष प्राचार्य राहुल वाहुळे, शहराध्यक्ष दिलीप देवकर ,सचिव महेश देशमुख, शहराध्यक्ष महिला आशा खिल्लारे, शेख गफार, प्रदीप भोले, नाना पेशकर यासह अनेक ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार परेश चौधरी , व्यापारी व ग्राहक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




यावेळी मंचक देशमुख यांनी अनेक विभागामधील नागरिकांना केलेल्या तक्रारीची प्रशासनाच्या वतीने दखल घेतली जात नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. असे मार्गदर्शन केले. तसेच नाना पेशकर यांनी अनेक विभागांमध्ये मनमानी कारभार चालू असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. 




प्राचार्य राहुल वाव्हळे यांनी अनेक ग्राहकांची फसवणूक होत असूनही ग्राहक तक्रार करीत नाहीत. याबद्दल खेद व्यक्त केला आहे. नागरिकांनी सतर्क राहून आपली झालेली फसवणूक लेखी स्वरूपात तक्रार दाखल करावी. आसे मार्गदर्शन करण्यात आले आहे.








Post a Comment

0 Comments