Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SA/ परभणीत मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाची अभिवादन रॅली उत्साहात





परभणी ➡️ येथे मराठा सेवा संघाच्या तीन दिवशीय राज्यस्तरीय महा अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी आज शुक्रवारी (दि.23) महापुरुषांना अभिवादन रॅलीचे परभणी जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजन करण्यात आले. येथील जिजाऊ मंदिर येथे उद्घाटक राजेश विटेकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा आरंभ करण्यात आला. (vnsnews-24, feature, parbhani ) 





या रॅलीचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अभिवादन रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे वेशभूषेतील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी - विद्यार्थिनींची सायकल रॅली. या रॅलीमध्ये गांधी विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, छत्रपती शाहू विद्यालय, आनंद माध्यमिक विद्यालय परभणी या सर्व शाळांमधील विद्यार्थी शिक्षक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 







जिजाऊ मंदिर येथून वसमत रोडने खानापूर फाटा वसमत रोडवरील वसंतराव नाईक पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील प्रांगणामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. 





याप्रसंगी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष  प्रा.अर्जुन तनपुरे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे प्रवक्ते पुरुषोत्तम जाधव, अभिवादन रॅली कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष दादा जावळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विठ्ठल भुसारे, मराठा क्रांती मोर्चा चे संबंध किशोर रणेर, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष कांचनताई कारेगावकर, चर्मकार संघाचे नागोराव माने, सुधीर साळवे, सुरेश शेळके, यशवंत मकरंद, शिवा संघटनेचे रामेश्वर कुबडे, धन्यकुमार शिवणकर, डॉक्टर अनिल कान्हे पाटील तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष  जावळे यांनी आपले अध्यक्षीय समारोपातून मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे महत्व विषय केले व राज्यभरातून येणाऱ्या मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. विविध ठिकाणावरून आलेल्या सर्व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची स्वागत करण्यात आले.

 



याप्रसंगी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष  कांतराव देशमुख झरीकर, अभिवादन रॅली कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष जावळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विठ्ठल भुसारे, जिजाऊ संस्थांचे सचिव रुस्तुमराव भालेराव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, जिजाऊ संस्थांचे अशोक रसाळ, मराठा सेवा संघाचे बाळासाहेब यादव, सचिव सुधाकर गायकवाड व विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव साहेब शिंदे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार संभाजी ब्रिगेडचे दिनकर गरुड यांनी मानले. (vnsnews-24, feature, parbhani ) 







Post a Comment

0 Comments