Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ देवगिरी ग्लोबल अकॅडमीचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे






परभणी ➡️ देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या नवव्या  वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त 22 डिसेंबरच्या सायंकाळी  'सेव्ह नेचर सेव्ह अर्थ ' ही संकल्पना सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीमती. आंचल सूद गोयल यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता शाळेने व पालकांनी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्याव्यात, ढासळत्या पर्यावरण संतुलनाबद्दल जागरूकता, भारतीय संस्कृतीची ओळख आदी विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (vnsnews-24, education, parbhani) 






याप्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक  मंडळ,औरंगाबाद चे सहसचिव तथा  अध्यक्ष, स्थानिक कार्यकारणी समिती श्री अनिल नखाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी माननीय सौ भावनाताई नखाते,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा परभणी, श्री विठ्ठलराव भुसारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


शाळेतील शिशुवर्ग ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सृष्टीच्या उत्पत्तीपासून सृष्टीचे विविध अंग, पर्यावरणाची सुरक्षा व त्याचे महत्त्व आपल्या विविध नृत्य अविष्कारातून मांडले. यासाठी विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा व देखावे  केले होते. कुमार स्वराज सुडके व सिद्धेश आचमे या वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक अहवाल उत्कृष्टरित्या सादर केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ शुभांगी काळपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन सौ.हर्षा श्रीवास्तव व सौ माधुरी पाटील यांनी केले.

 




याप्रसंगी डॉक्टर समप्रिया राहुल  पाटील, मंगेश नरवाडे,  संचालक आनंद पाथ्रीकर, प्राचार्य शाहिद ठेकिया, प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजेश देशमुख, स्थानिक कार्यकारणीचे मान्यवर सदस्य बद्रीनाथ काकडे, डॉक्टर श्यामजी जेथलिया, डॉक्टर कश्मीरा टेकाळे, एडवोकेट संजय औंढेकर आदींची उपस्थिती होती.




विद्यार्थ्यांचे आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी त्यांचे पालक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या शिक्षक व कर्मचारी वृंदाने अथक परिश्रम घेतले.(vnsnews-24, education, parbhani) 








Post a Comment

0 Comments