Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ युवकांनी समाजबदलाच्या भूमिकेतून काम करावे - अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांचे आवाहन




♦️श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे उदघाटन 

परभणी ➡️ आज गाव आणि शहरात प्रचंड दरी निर्माण होताना दिसत आहे. गावांचा भौतिक विकास झाला असला तरी अनेक समस्या ह्या गाव, समुदाय विकासात अडथळा ठरल्या आहेत. या समस्यांच्या निवारणासाठी युवकांनी समाजबदलाच्या भूमिकेतून कार्य केले पाहिजे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी गुरुवार (दि.१९) रोजी केले.(vnsnews-24, education, parbhani ) 




श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १८ ते २४ जानेवारी दरम्यान तट्टू जवळा येथे विशेष शिबिर संपन्न होत आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत केले. यावेळी मंचावर सहायक पोलीस निरीक्षक विजय रामोड, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामेश्वर कदम, सरपंच नारायण कदम, उपप्राचार्य आप्पाराव डहाळे, डॉ.पूजा हातागळे, कार्यक्रमाधिकारी डॉ.तुकाराम फिसफिसे, समाधान कदम, दिपक जाधव, सोपानराव जाधव, रवी कदम, सदाशिव कदम, अरुणराव कदम आदींची उपस्थिती होती.




युवकांचा ध्यास: ग्राम शहर विकास हे ब्रीद वाक्य घेऊन चालू झालेल्या शिबिरातील स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे पुढे म्हणाले कि, "युवक हा समाजाचे नेतृत्व करीत असतो. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. बालविवाहासारख्या समस्याकडे चिकित्सक दृष्टीने बघून त्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करावेत. आर्थिक बचत करत व्यसनापासून दूर राहिले पाहिजे" असा सल्लाही यावेळी त्यांनी युवकांना दिला. यावेळी त्यांनी उपस्थितांना बालविवाह प्रतिबंध शपथ ही दिली.



तर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, रासेयो ही व्यक्तिमत्त्व घडविणारी चळवळ आहे. ग्रामीण भागाच्या समस्या शहरी विद्यार्थ्यांना समजाव्यात तसेच त्यांना सामाजिक दायित्वाची जाणीव व्हावी या उद्देशाने अशी शिबिरे यशस्वी होतात. सुखसुविधा वाढल्याने युवक आळशी होत आहेत. यातून बाहेर काढण्याचे काम रासेयो करत असते असेही ते म्हणाले.




सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात पर्यावरण संरक्षण, आर्थिक साक्षरता, आजादी का अमृत महोत्सव, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध आदी विषयावर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराची सांगता उपमुख्यकार्यकरी अधिकारी ओमप्रकाश यादव, ज्ञानेश्वर कदम, माऊली वाघमारे, डॉ.सुरेश भालेराव, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य  परमेश्वर जाधव, ऍड.स्वराजसिंह परिहार, प्रा.रामभाऊ घाडगे, डॉ.अफवान खान, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 



उदघाटन कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तुकाराम फिसफिसे, सूत्रसंचालन प्रशांत खंदारे तर आभार प्रा.डॉ.दिगंबर रोडे यांनी मानले. सदरील कार्यक्रमास बहुसंख्येने स्वयंसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.सविता कोकाटे, प्रा.राजेसाहेब रेंगे, प्रा.विलास कुराडकर, प्रा.श्रध्दा पांडे, प्रा.स्वाती देशमुख, दासू मस्के, अच्युत तरफडे, माधव कदम, ज्ञानदेव कदम, बालाजी कदम, भगवान कदम, मोतीरामजी कदम, बंडू महाराज, रामप्रसाद कदम आदींनी पुढाकार घेतला.






Post a Comment

0 Comments