Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिंतूरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इलेक्ट्रॉनिक मापात "पाप"




✴️ शेतकऱ्यांच्या मालावर व्यापाऱ्यांचा डल्ला संभाजी ब्रिगेडने केला प्रकार उघड

 ✴️ बाजार समिती यार्डातील इलेक्ट्रॉनिक वजन काटा सील

जिंतूर ➡️ शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती व खाजगी वजन काट्यात तब्बल दहा किलोची तफावत येत असल्याने शेतकऱ्यांची शेतमाल विक्री करताना मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा प्रकार संभाजी ब्रिगेडने समोर आणला. याबाबत शुक्रवार 20 जानेवारी रोजी सहाय्यक निबंधक यांना निवेदन देण्यात आले असून बाजार समिती प्रशासनाकडून संबंधित वजन काटा सील करण्यात आला आहे. (vnsnews-24, feature, jintur) 




याबाबत अधिक माहिती अशी की, बाजार समितीच्या यार्डात इलेक्ट्रॉनिक वजन काटा असून या वजन काट्यावरून  शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी करण्यात येतो. यावेळी खाजगी व बाजार समितीच्या वजन मापात  शेतकऱ्यांना वजन करताना  वेळोवेळी तफावत येत असल्याचे आढळून आल्याने या बाबतीत शेतकऱ्याच्या तक्रारी वरून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समिती व इतर खाजगी वजन काट्यावर मोजले असता यामध्ये तब्बल 10 ते 15 किलो किलोची तफावत आढळून आली.




यावेळी संबंधित प्रकार हा सहाय्यक निबंधक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्या कानावर घालून याबाबत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीचे कर्मचारी प्रवीण कदम यांनी संबंधित वजन काट्याची पाहणी करून तफावत आढळल्याने तात्पुरत्या स्वरूपात सायंकाळच्या सुमारास वजन काटा सील करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष शरद ठोंबरे, तालुका अध्यक्ष अँड. माधव दाभाडे, ज्ञानेश्वर रोकडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.





चौकट

मागील काही दिवसांपूर्वी बाजार समितीच्या इलेक्ट्रॉनिक काटा यार्डातील एका बड्या व्यापाऱ्यास खाजगी तत्वावर चालवण्यासाठी देण्यात आला असल्याचे सांगितले आहे त्या व्यापाऱ्या कडून मोठया प्रमाणात शेतमाल खरेदी करण्यात येतो म्हणून शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असल्याचे बोलले जात आहे म्हणून संबंधित व्यापाऱ्याची चौकशी करण्याची मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे




Post a Comment

0 Comments