Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ ट्रकने उडविले दुचाकीला, अपघातात दोन शिक्षक जागीच ठार




गंगाधर राऊळ          /             रामेश्वर कदम
परभणी ➡️  मानवत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते निर्मल  रस्त्यावर आज मंगळवारी (दि.14) सकाळी सव्वा आठ वाजता झालेल्या भीषण अपघातात  येथील दोन शिक्षक जागीच ठार झाले. (vnsnews-24, accident, parbhani ) 





मानवत येथील शकुंतला विद्यालयातील दोन शिक्षक रामेश्वर कदम व गंगाधर राऊळ हे दुचाकी (क्र. MH - 22 - AH -7031) वरून शाळेकडे जात होते. त्याचवेळी पाथरीहून परभणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक (क्र.MH - 13 - R - 3684) च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगात व हलगर्जीपणाने चालवून दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातात शिक्षक रामेश्वर कदम व गंगाधर राऊळ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.






Post a Comment

0 Comments