Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार आरोग्य केंद्रात 332 विद्यार्थ्यांचे लसीकरण 




जिंतूर ➡️  तालुक्यातील आंडगाव बाजार आरोग्य केंद्रात शाळकरी विद्यार्थी (वयोगट) 15 ते 17 असलेल्या तब्बल 332 शाळकरी विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वाजिद अली कादरी यांच्या आज वतीने देण्यात आली.


जिंतूर तालुक्यातील आंडगाव बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प.सिईओ शिवानंद टाकसाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिनेश बोरळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, शिक्षण विभाग,ग्रामपंचायत यांच्या परिश्रमातून आंडगाव बाजार येथे कोरोना लसीकरणात प्रौढ नागरिकांतून प्रथम लस 19926 दुसरी लस 13220 व विद्यार्थी प्रथम लस 332 असे एकूण 33146 लसीकरण झाले.

पुढे कोरोना व ओमीक्रोन वेरियट चा धोका लक्षात घेऊन लवकरात लवकर आंडगाव बाजार आरोग्य केंद्रात शंभर टक्के लसीकरण यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे ग्रामस्थ नागरिकांनी आरोग्य विभागाला शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन. डाॅ.सय्यद वाजिद अली कादरी.




केंद्र व राज्य सरकारने ने कोरोना व ओमीक्रोन वेरियट चा धोका लक्षात घेता संपूर्ण देशात नवीन वर्षाचे औचित्य साधून वय 15 ते 17 वयोगटातील शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना कोरोना लसीकरण देण्याची सुरुवात केली.  प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंडगाव बाजार आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद वाजिद अली यांनी आडगाव बाजार येथील शारदा विद्यालय व महाविद्यालय, महात्मा गांधी प्रा.मा.विद्यालय येथील शाळकरी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व सांगून ऑनलाईन नोंद करून 332 विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.




यावेळेस डाॅ.सय्यद वाजीद अली कादरी, औषधनिर्माण अधिकारी फाले,आरोग्य सहाय्यक खंदारे,आरोग्य सेविका आशाश्रध्दा दाभाडे,सविता दाभाडे, अंगणवाडी ताई, मदतनीस, शारदा विद्यालय चे मुख्याध्यापक राठोड, शिक्षक, संजय राठोड,नवाज कुरेशी, संजय दाभाडे,महात्मा गांधी प्रा.मा.विद्यालयचे अध्यक्ष सय्यद हकीम, मुख्याध्यापक शिक्षक गुलाब जाधव,कर्हाळे,शेख सिराज आदींनी परिश्रम घेतले होते.


  





Post a Comment

0 Comments