Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ऑक्सीजन प्रकल्प येत्या दोन दिवसात कार्यान्वित होणार






परभणी ➡️ जिल्ह्यात  कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. या अनुषंगाने आ.डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परभणी येथे ऑक्सीजन प्रकल्प उभारण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी परळी थर्मल येथील ऑक्सीजन प्रकल्प परभणी येथे स्थलांतरित करण्याचे आदेश मुख्य सचिवांमार्फत विभागीय आयुक्तांना दिले. त्यानुसार परळी थर्मल येथील ऑक्सीजन प्रकल्प परभणी येथील जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत येत्या दोन दिवसात कार्यान्वित होणार आहे. मागणी त्वरीत मंजूर केल्याबद्दल आ. डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 


आज ITI कोविड सेंटर येथे रेमेडिसीवर संदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली. मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना मी परभणी जिल्ह्यासाठी मुबलक पुरवठा करावा अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. आलेल्या इंजेक्शनचे प्रत्येक रुग्णालयासाठी समान वाटप करावे व गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक नागरगोजे व ड्रग ऑफिसर श्री. मेडेवार उपस्थित होते.


परभणी जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. सद्यस्थितीत परभणी येथील एमआयडीसी परिसरात खाजगी तत्त्वावर उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प अस्तित्वात असून त्याद्वारे जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोवीड सेंटर्सना ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्यात येत आहेत. जिल्ह्याला दररोज 25 के एल क्षमतेच्या ऑक्सिजनची गरज भासत आहे. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून 80 हजार लिटर प्रतितास एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. परळी थर्मल येथून सदर ऑक्सिजन प्रकल्प परभणी येथे स्थलांतरित होत असून परभणी येथील जिल्हा परिषदेच्या  नवीन इमारत परिसरात हा प्रकल्प येत्या दोन दिवसात कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी त्वरित मंजूर केल्याबद्दल आ. डॉ. राहुल पाटील यांनी जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.



Post a Comment

0 Comments