Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

दोषी ग्रामसेवकावर कार्यवाही करा, पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा तात्काळ लाभ द्या - आमदार  मेघना बोर्डीकर 





जिंतूर ➡️ ग्रामीण भागातील अंसख्य लाभार्थी घरकुल व अनुदान योजनेच्या अंतर्गत येत असलेल्या संजय गांधी निराधार, श्रावन बाळ योजना अशा अंसख्य वंचित लाभार्थिना सोबत घेवून आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर सोमवारी (दि.06) गट विकास अधिकारी व्ही. एम. मोरे व तहसीलदार सखाराम मांडवगडेे यांच्या दालनात भेट दिली. 



यावेळी गटविकास अधिकारी व्हि.एम. मोरे यांच्या समक्ष ग्रामीण भागातील असंख्य वंचित घरकुल लाभार्थ्यांना लाभ भेटत नाही. ज्यांना घरं आहेत त्यांनाच लाभ भेटत असल्याच्या असंख्य तक्रारी आहे. विशेषतः ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर यांच्या तक्रारी केल्या गेल्या तेव्हा आमदार मेघना बोर्डीकर यांनी गटविकास अधिकारी मोरे यांना सुचित केले की चुकीने काम करणारे ऑपरेटर व ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ कारवाई करा.



या अक्षम्य चुकीमुळे ग्रामीण भागातील शेकडो पात्र घरकुल लाभधारक लाभापासून वंचित राहिले आहेत, अशी भूमिका यावेळी मांडली. यानंतर बोर्डीकर यांनी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांची भेट घेत तालुक्यातील स्मशानभूमी, निराधार योजना, पांदण रस्ते आदीबाबत प्रगती अहवालाची विचारणा करत तालुक्यातील पात्र लाभार्थी वंचित राहू नये व ज्या ज्या गावातून पांदण रस्ते असो किंवा स्मशानभूमीचा प्रश्‍न असो आधी सर्व प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली.




यावर तहसीलदार मांडवगडे यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन कारवाई करण्याबद्दल आश्‍वासित केले. ग्रामीण स्तरावर पात्र घरकुल लाभार्थ्यांना डावलून अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्याची मागणी आपण लवकरच संबंधित मंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करणार असून दोषी ग्रामसेवक तसेच संबंधित ऑपरेटर यांच्यावर कारवाई करून निलंबनाची मागणी करणार आहोत, असे आमदार बोर्डीकर यांनी या बैठकीत सांगितले.



तालुक्यात शासनस्तरावरील लाभ पात्र लाभार्थींना न दिल्यास ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. यामुळे भविष्यात वेळोवेळी शासनाच्या सर्व सर्व योजनेवर लक्ष केंद्रित करून विशेषतः ग्रामीण भागातील घरकुल योजना व संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच शेत रस्ते, पांदण रस्ते व स्मशानशभूमीचा प्रश्‍न अग्रक्रमाने सोडवणार असल्याचे मत आ.बोर्डीकर यांनी व्यक्त केले. आमदार सौ. बोर्डीकर यांच्या समवेत राजेंद्र थिटे, प्रमोद चव्हाण, लक्ष्मण इलग, लक्ष्मण बुधवंत, दत्ताभाऊ कटारे, सुमेध सूर्यवंशी, मधुकर काकडे, सुयोग मुंडे, गजानन गडदे, सुदाम, घनसावंत, नागेशआकात सुनील घुगे, संदीप घुगे, युवराज घनसावंत आदिंची उपस्थिती होती.






Post a Comment

0 Comments