Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

झेरोफाटा चेकपोस्टवर अचानक भेट देऊन सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी केले लसीकरण 





परभणी ➡️ ओमायक्रोन आणि कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आज पुढाकार घेऊन थेट चेक पोस्टवर जाऊनच उर्वरित नागरिकांचे लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासण्या करून घेतल्या. 





रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी येथील झिरो फाटा येथील चेक पोस्टवर मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी अचानक भेट देऊन जिल्ह्यात येणाऱ्या दोनचाकी, चारचाकी वाहनधारक नागरिकांचे लसीकरण आणि आररटीपीसीआर चाचण्या करून घेतल्या. 98 एवढ्या नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या तर 105 एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 


सदरची मोहिम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गीते, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, गट विकास अधिकारी सुनीता वानखेडे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी गणेश शिरसुलवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पुजा धूतराज, वैद्यकीय अधिकारी डॉ कांचन चापके, पोलीस उप निरीक्षक दिनेश मुळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक चारुशीला फुलपगार, डॉ.जोशी, डॉ मुनेश्वर, विस्तारअधिकारी आरोग्य अविनाश बेलोकर, आरोग्य सेवक गडगीळे, एएनएम श्रीमती आम्ले, श्रीमती मनवर, श्रीमती खंदारे, समाजशास्त्र परमेश्वर हलगे, पिराजी सावळे, पोलीस कर्मचारी व शिक्षक यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 






Post a Comment

0 Comments