Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जांभूळ बेटात जाण्यासाठी बोटेचे लोकार्पण, माफक दरात पर्यटकांची सुविधा 




पालम (आरूणा शर्मा ) ➡️ तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध वसलेल्या निसर्ग रम्य पर्यटन स्थळ असलेल्या जांभूळ बेटात जाण्यासाठी लोकसहभागातून खरेदी करण्यात आलेल्या बोटेचे लोकार्पण 05 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.




अतिशय माफक दरात बेटात जाण्यासाठी पर्यटकांना सुविधा दिली जाणार आहे जांभूळ बेटात जाण्यासाठी गैरसोय होत असल्याने पर्यटक बेट न पाहता रिकाम्या हाताने परतावे लागत होते. त्यामुळे जांभूळ बेट संवर्धन समितीने बेटात जाण्यासाठी लोक सहभागातून बोट खरेदीसाठी आवाहन केले होते.






या आवाहनाला प्रतिसाद देत अर्थिक मदत दिली आहे. यातून लोखंडी बोट खरेदी करून ती पर्यटकांसाठी सेवेत दाखल करण्यात आली आहे यावेळी कांतराव काका देशमुख, प्राचार्य आत्माराम आरसुळे, राम कदम, गोविंद दुधाटे, पत्रकार लक्ष्मण दुधाटे, संतोष मुगटकर, संदीप दुधाटे आदीसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते






Post a Comment

0 Comments