Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव येथे प्रेमविवाह केला म्हणून भावानेच केली बहिणीची हत्या 





औरंगाबाद ➡️ प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच सख्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्‍कादायक घटना आज ( दि. 05) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास वैजापूर येथील लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर घडली. बहिणीचा खून केल्यानंतर निर्दयी भाऊ तिचे मुंडके हातात धरून घराबाहेर फिरत होता. हा थरार आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांचाही थरकाप उडाला. किर्ती अविनाश थोरे (वय. 19, रा. लाडगाव शिवार ता. वैजापूर) असे मृत विवाहित बहिणीचे नाव आहे.




याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील लाडगाव येथील अविनाश थोरे व किर्ती मोटे या दोघांनी 21 जून 2021 रोजी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. किर्तीच्या घरातील सदस्यांचा या विवाहासाठी विरोध होता. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुमारास किर्तीची आई शोभा मोटे व अल्पवयीन 17 वर्षीय भाऊ हे दोघे नगिना पिंपळगाव येथून किर्तीला भेटण्यासाठी तिच्या लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर आले.



आई व भाऊ आल्यामुळे किर्ती चहा ठेवण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. काही क्षणातच तिचा भाऊही तिच्या मागून गेला. त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता तो तिच्या कानावर बसला. त्यामुळे तिचा कान तुटून ती खाली कोसळली. ही संधी साधून भावाने तिच्या गळ्यावर सपासप वार करून मुंडके धडावेगळे केले. 



ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने आपला मोर्चा तिचा नवरा अविनाश थोरे याच्या खोलीकडे वळविला. त्याने अविनाश याच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला . परंतु अविनाश कोयत्याचे वार चूकवत घराबाहेर पळाला.



अविनाश आजारी असल्यामुळे तो आपल्या खोलीत आराम करीत होता. घरामध्ये हा थरार सुरू असताना परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अविनाश बाहेर गेल्यानंतर मारेकरी पुन्हा घरात घुसला व त्याने किर्तीचे मुंडके हातात धरून घराबाहेर आणले. त्यानंतर त्याने अविनाश याच्यासह नागरिकांकडे ‘बघून बघितले का? याचा परिणाम काय झाला’. असे म्हणून तेथून फरार झाला. त्याच्या हातातील मुंडके पाहून उपस्थित नागरिकांचाही थरकाप उडाला होता.




त्यानंतर मारेकरी भाऊ स्वतःहून वैजापूर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्‍याने गुन्‍ह्यांची कबुली दिली. त्यानंतर वैजापूर पोलिसांनी त्याला वीरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान ,या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, वीरगाव पोलीस, ठसे तज्ज्ञ‍ पथकासह इतर शोध पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.



या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. किर्तीची आई व भाऊ तिच्या घरी येण्यापूर्वीच नियोजित कट करून आले होते. तिचा भाऊ जर्कीन घालून आला होता. त्यामध्ये त्याने कोयता लपवून आणला होता. संधी मिळताच त्याने किर्तीचा काटा काढला.





Post a Comment

0 Comments