Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राज्यस्तरीय सिनियर फ्लोअरबॉल स्पर्धेत ठाणे तर सबज्युनियर गटात परभणी, मुलीत धुळे विजेता




 सेलू   ➡️ फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने परभणी डीस्ट्रींक असोसिएशनच्या वतीने माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 7 वी राज्य सबज्युनियर व सिनियर फ्लोअरबॉल अजिंक्य स्पर्धा साई मंगल कार्यालय सेलू येथे दि. 3 ते 5 डिसेंबर आयोजित करण्यात आले होते.



यात सिनिअर मुलांच्या गटात ठाणे, तर मुलीत धुळे संघानी तर सबज्युनियर मुलात परभणी तर मुलीच्या गटात धुळे संघाने बाजी मारली. सिनिअर गटात उपांत्य फेरीत ठाणे संघाने वाशिम संघाचा 5-1 गोलने पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत लातूर संघाचा 4-0 गोलांनी पराभव करत प्रथम : ठाणे, व्दितीय: लातूर तर तृतीय स्थान वाशिम पटकाविला.



मुलीच्या गटात अनुक्रमे धुळे, ठाणे, जळगांव संघानी विजय ठरवले. सबज्युनियर मुलाच्या गटात अंतिम सामन्यात परभणी संघांनी धुळे संघाचा 3-1 गोलंने पराजित करत प्रथम:-परभणी, व्दितीय; धुळे संघ विजेता ठरली. विजेत्या संघांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने, प्रमुख पाहुणे फ्लोअरबॉल असो.चे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, जि.प सदस्य, माजी सभापती अशोक काकडे, गिरीश लोडाया, राज्य सचिव रविंद्र चोथवे, राज्य कोषाध्यक्ष दिपक वाडे, सहा. पो.नि.माधवआण्णा लोकुलवार, प्रा.नागेश कान्हेकर, राज्य सचिव गणेश माळवे, जिल्हा सचिव प्रशांत नाईक यांच्या हस्ते विजेत्या संघाला सुवर्ण पदके, उप विजेत्या संघाला रौप्यपदके व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.



 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे तर संयोजक प्रशांत नाईक यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी ते साठी बालासाहेब राठोड, संतोष शिंदे, अनिरूद्ध नाईक, बालाजी फंड, कुनाल चव्हाण, वेदांत सराफ, सत्यम बरकुले,प्रसाद इंद्रोके,आदींनी परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments