Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

चला बदल घडवूया .. उपक्रमांतर्गत रविवारी विशेष व्याख्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन








परभणी ➡️ सक्सेस कॉटन इंडस्ट्रीज व श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठान, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने 'चला बदल घडवूया ...' या उपक्रमांतर्गत रविवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.


'शेतमाल विक्री व्यवस्थापन आणि त्यामधील व्यवसायाच्या संधी' या विषयावर मुंबईतील वित्तीय सल्लागार दिलीप देशमुख (IIT, Gold Medalist Khargpur, M.B.A. Finance, I.I.M.Ahmadabad) हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, सातारा येथील दीपज्योती फाउंडेशनच्या दिपालीताई घाटगे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 


या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील 10 मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे सांस्कृतिक सभागृह, वसमत रोड, परभणी येथे होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित रहावे. कोव्हीड १ ९ चे सर्व शासकीय नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वांनी मास्क लावून यावे व योग्य अंतर राखावे असे आवाहन आयोजक तथा सक्सेस कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक उद्योजक श्री मुरलीधर डाके यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments