Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्वातंत्र्य दिनी सेलू तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन









सेलू ➡️ सेलू तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या तालुका क्रीडा संकुलाचा भूमीपूजन समारंभ रविवारी, स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. 


नगर परिषद स्टेडियमच्या परिसरात दुपारी एक वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंतूर-सेलूच्या आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समिती अध्यक्ष मेघना साकोरे-बोर्डीकर सेलू, प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, नगराध्यक्ष विनोद बोराडे, सहाय्यक पोलीस उपअधिक्षक श्रवण दत्त.एस, औरंगाबाद विभागाच्या क्रीडा व युवक सेवा उर्मिला मोराळे उपसचांलिका डॉ. उपविभागीय अधिकारी अरुण जर्‍हाड, जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, श्री शिव छत्रपती राज्य पुरस्कार्थी मंगल पांडे, उत्तम इंगळे, डॉ. माधव शेजुळ हे उपस्थित  राहणार आहे.


तालुका क्रीडा संकुल समितीचे कार्याध्यक्ष तहसीलदार बालाजी शेवाळे, प्रभारी तालुका क्रीडाधिकारी संजय मुंढे, मुख्याधिकारी निलेश सुकेवार, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, गटशिक्षणाधिकारी जी.सी यरमळ, क्रीडा अधिकारी शैलेंद्र गौतम, उपविभागीय अभियंता सा.बां.वि. प्रल्हाद कोरे, गटविकासअधिकारी व्हि.एम मोरे, पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, नावाडे सी.टी. गणेश माळवे हे सदस्य आहेत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. करोनाचे नियम पाळून उद्घाटन समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 




Post a Comment

0 Comments