Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

विना मास्क बाईकवर फिरणाऱ्या चालकाने फोडले ड्युटीवरील तैनात पोलीस कर्मचाऱ्यांचे डोके






परभणी ➡️ विना'मास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरूध्द कारवाई करीत असताना दुचाकी चालकाने दगड फेकून मारल्याने पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्यातील नाईक पो. कॉ. प्रभाकर निवृत्तीराव कच्छवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सद्या जखमी अवस्थेतील नाईक पो.कॉ. प्रभाकर कच्छवे यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.





पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील चूडावा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सैदाणे व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी हे 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेचेदरम्यान, चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसमत फाटा परिसरात 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तथा 'विना'मास्क फिरणाऱ्या दुचाकीचालकांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत होते. त्याचवेळी चुडावा येथील रहिवासी असलेले आरोपी 'देसाई' नावाच्या दुचाकीधारकाने उपरोक्त ठिकाणी आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांवर दगडफेक केली. दरम्यान, तेथे कर्तव्यावर उपस्थित असलेल्या नाईक पो.कॉ. प्रभाकर कच्छवे यांच्या डोक्यास दगड लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सद्या नांदेड येथील एका  खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.



Post a Comment

0 Comments