Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पारवा शिवारातील जुगार अड्डावर पोलिसांची धाड, 08 आरोपी अटक





परभणी ➡️ स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पारवा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (दि.09) रात्री 11 वाजता धाड टाकली. याठिकाणी जुगार खेळणाऱ्या 08 आरोपीकडून 01 लाख 44 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.  यासंदर्भात परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 

प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार साईनाथ पुयड, कर्मचारी बाळासाहेब तुपसुंदर, शेख अजहर, सय्यद मोबीन, किशोर चव्हाण, हरिचंद्र खुपसे, निळे यांच्या पथकास पाथरी रस्त्याच्या बाजूस जांबकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेख नबी अब्दूल कादर यांच्या आखाड्यावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती 09 एप्रिल रोजी रात्री 11.15 वाजता मिळाली. त्यावेळी तेथे जुगार खेळणाऱ्या आठ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

यात 1) शेख मुसा शेख जमाल, रा.मेहराज नगर परभणी याच्याकडून 8,500/- रुपये नगदी व मोबाईल, 2) शेख असीफ शेख रशीद, रा मेहराज नगर परभणी यांच्याकडून 9,500/- रुपये नगदी व 5,000/- रुपयांचा मोबाईल, 3) शेख मुख्तार शेख इस्माईल, रा मेहराज नगर परभणी याच्याकडून 7,850/- रुपये नगदी व 6,500/- रुपयांचा मोबाईल, 4) इरफान खान करीम खान रा.रहेमत नगर परभणी, याच्याकडून 6,100/- रुपये नगदी 5) शेख रफीक शेख हबीब, रा.रहेमत नगर परभणी याच्याकडून 6,100/- रुपये नगदी व 5,000/- रुपयांचा मोबाईल 6) युसूफ खान नबाब खान पठाण, रा. बालाजी नगर, परभणी याच्याकडून 7,400/- रुपये नगदी व 5,000/- रुपयांचा  मोबाईल, 7) सोहेल बेग नजीर बेग, रा. अमीन कॉलनी, धार रोड, परभणी याच्या कडून 7,800/- रुपये नगदी व 8,000/- रुपयांचा मोबाईल आणि 8)  मोहसीन खान इकबाल खान रा जाकीर हुसेन नगर परभणी याच्या कडून 4,600/- रुपये नगदी व 5000/- रुपयांचा मोबाईल तसेच असीफ शेख रशीद यांची 50,000/- रुपये किमतीची मोटार सायकल जप्त केली. 

यात 08 जुगाऱ्यांकडून रोख 58 हजार 820 रुपयांसह 07 मोबाईल, 01 मोटरसायकल असा एकूण 01 लाख 44 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. या संदर्भात शेख अझर शेख जफर वय 35 वर्षे पोना/1502 नेमणूक स्थागुशा यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे परभणी ग्रामीण येथे कलम 12 (3) म.जु. का. प्रमाणे गुन्हा नोंद केला.




Post a Comment

0 Comments