Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

बोरी येथे आगीत 05 दुकाने जळून खाक, व्यापारी बांधवांचे 20 लाखांचे नुकसान





परभणी
➡️ जिंतूर तालुक्यातील बोरी येथील बस स्थानक समोर असलेल्या पाच दुकानांना दि. 10 एप्रिल रोजी सकाळी भीषण आग लागली. या आगीत व्यापाऱ्यांचे 20 लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. जिंतूरचे अग्निशामक दल आल्याने पुढील अनर्थ टळला. 



जिंतूर तालुक्यातील बोरी येथील बस स्थानक समोर मध्यम स्थितीतील व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. यातील साईराज मशिनरी स्टोअर्स, कलाश्री जेंट्स पार्लर, पार्थ प्रिंटिंग, बालाजी हेअर सलून व जैन टी हाउस या दुकानांना शनिवार दि. 10 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. 


नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आग लागल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. कर्तव्यावर असलेले जमादार ए.एच. चौधरी व कर्मचारी शेख यांनी जिंतूरच्या अग्निशामक दलास भ्रमणध्वनी च्या मार्फत संपर्क साधून बोलावले. अग्निशामक दल, गावातील नागरिक व व्यापारी यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यामुळे इतर दुकानांचे नुकसान टळले. 




या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली असून महसूल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला.आग लागलेल्या दुकानातील विविध प्रकारचे सर्व साहित्य व दुकाने जळाल्याने या व्यापाऱ्यांची जवळपास 20 लाखांचे नुकसान झाले. या व्यापाऱ्यांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.



Post a Comment

0 Comments